या चित्रपटातून आधीच दिली होती कोरोनाची चेतावणी; वाचून धक्काच बसेल

 Corona's warning was already given from this film.
Corona's warning was already given from this film.
Updated on
पुणे: कधीही न बुडणारे टायटॅनिक जहाज हे बुडण्याच्या 14 वर्षाच्याआधी मॉर्गन रॉबर्टसन यांनी त्यांच्या 'द रेक ऑफ टायटन' या कादंबरीत या घटनेचा हुबेहूब उल्लेख केला होता. याचप्रमाणे डीन कुंट्स यांची 1981 साली प्रसिद्ध झालेली कादंबरी द आय ऑफ डार्कनेसमध्ये जैविक युद्धाचा आजच्या घडीशी मिळता जुळता उल्लेख केलेला पाहायला मिळतो.त्याचप्रकारे अनेक चित्रपटांमध्ये अश्या घटना दाखवल्याचे आपल्याला पाहायला मिळेल. अश्याच सहा चित्रपटांबद्दल आज आपण वाचणार आहोत.

काँटेजीन: 2011 मध्ये आलेल्या या चित्रपटात जैविक विषाणू पसरून कसा विनाश होतो हे दाखविण्यात आले आहे. योगायोगाने या चित्रपटात सुद्धा वटवाघुळामुळे हा विषाणू पसरला असल्याचे दाखविण्यात आले आहे.

माय सिक्रेट टेरेस: 2018 साली प्रसिद्ध झालेल्या एका प्रसिद्ध दक्षिण कोरियन नाटकाचा हा भाग आहे. यामध्ये कोरोनाला जैविक हत्यार म्हणून दाखविण्यात आले आहे. यात प्रत्येकाला घरात राहण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. म्हणजे सध्या आपण पाळत असलेले सोशल डिस्टंसिंग यात दाखविण्यात आले आहे.

पँडेमिक: 2007 साली आलेल्या या चित्रपटात एका पक्ष्यापासून सुरु झालेला हा संसर्ग कशाप्रकारे पूर्ण लॉस एन्जेलिस शहरात पसरला व नंतर जगभर पसरला हे दाखविण्यात आले आहे. या चित्रपटात विषाणूच्या संसर्गाविषयी अनेक गोष्टी दाखविण्यात आल्या असून सध्या आपण ज्या घटना आपल्या आसपास पाहत आहोत त्या सर्व घटना या चित्रपटात आहेत.

फॅटल कॉन्टॅक्ट: 2006 साली आलेल्या चित्रपटात अमेरिकेत बर्ड फ्लू कसा पसरला हे दाखविण्यात आले आहे. या फ्लू मुळे जगभरात 35 कोटीपेक्षा जास्त जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचे दाखविण्यात आले आहे.

व्हायरस: 1980 साली आलेल्या या जपानी चित्रपटात इटलीतील विषाणूचा संसर्ग दाखविण्यात आला आहे. ज्यामध्ये जगातील अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचे दाखविण्यात आले आहे. त्याकाळातील जपानमधील हा सर्वात महागडा चित्रपट ठरला होता.

टॅंगल्ड: 2010 साली रॅपनझूलच्या प्रसिद्ध गोष्टींवर तयार करण्यात आलेल्या या चित्रपटात कोरोनाविषयी अनेक मनोरंजक गोष्टी आहेत. रॅपनझूलचा जन्म कोरोना शहरामध्ये झाला होता असे यात दाखविण्यात आले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात तिला क्वारंटाईन करून सुद्धा ठेवण्यात आल्याचं दाखविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com