कोरोनामुळे स्वतःला केले काचेच्या पेटीत कैद 

Coronavirus effect Dj Diplo Self Isolation Video
Coronavirus effect Dj Diplo Self Isolation Video
Updated on

कोरोना व्हायरसची दहशतच इतकी आहे कि,सर्वजण आपली काळजी घेताना दिसत आहे. जगातील सेलिब्रिटी करोना व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी विलगीकरण कक्षात राहिले आहेत. त्यासाठी स्वतंत्र खोल्या  हि बनवल्या आहेत. अमेरिकन संगीतकाराने करोनाच्या प्रादुर्भावापासून आपल्या मुलांचे संरक्षण करण्यासाठी स्वत:ला काचेच्या पेटीत बंद करुन घेतले आहे.

काही दिवसांपासून डिपलो आजारी आहे. त्याला कोरोनाची लक्षणे म्हणजेच सर्दी आणि खोकल्याचा त्रास होतोय. म्हणून भीतीपोटी स्वत:ला एका खोलीत कोंडून ठेवले. कारण डीजे डिपलो याला असं वाटत कि आपल्यामुळे मुलांना कुठल्याही प्रकारचा आजार होऊ नये. त्यासाठी आधी त्याने स्वतःला एका स्वत:ला एका खोलीत कोंडून ठेवले होते.पण मुलांपासून दूर राहूनही त्यांच्या संपर्कात राहण्यासाठी एक वेगळीच युक्ती शोधून काढली. ती म्हणजे चक्क स्वतःसाठी  एक काचेची खोलीच तयार करुन घेतली. ज्यामधून तो मुलांकडे लक्ष देत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Thomas Wesley (@diplo) on

इन्स्टाग्रामवरचा हा विडिओ डीजे डिपलोने पोस्ट केला. तो आता खूप व्हायरल ही झाला. प्रत्येक आई वडिलांना स्वतःचे मूल हे जीवापेक्षा प्रिय असते. मुलांसाठी पालक कोणताही थराला जाऊ शकतात.याची प्रचिती हा विडिओ पाहून येते. म्हणून हा विडिओ पाहून डिपलोचे  फॅन्स आणि नेटकरी भावूक झाले आहेत.त्यासाठी डिपलोचे कौतुक खुपजण करत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com