esakal | आर्यन खानसह तिन्ही आरोपींना ७ ऑक्टोबरपर्यंत NCB कोठडी : न्यायालय
sakal

बोलून बातमी शोधा

Aryan Shahrukh Khan

आर्यन खानसह तिन्ही आरोपींना ७ ऑक्टोबरपर्यंत NCB कोठडी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : मुंबईच्या किनाऱ्याजवळ (Mumbai coast) कॉर्डेलिया क्रूझवर रेव्ह पार्टी (rave party) सुरु असताना शनिवारी NCB ने छापा मारला. या कारवाईतून बॉलिवूड आणि ड्रग्सचं (Drugs) कनेक्शन पुन्हा एकदा समोर आलं आहे. शाहरुखचा मुलगा आर्यन खानला पोलिसांनी अटक केली आहे. आर्यनसोबत अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा सुद्धा अटकेत आहे. आज एनसीबीकडून आरोपींना मुंबईतील किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी एनसीबीने आर्यन खानच्या एनसीबी कोठडीची मागणी केली आहे. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुमुन धामेचा तीन आरोपींना न्यायालयाकडून ७ ऑक्टोबरपर्यंत NCB कोठडी (NCB Custody) देण्यात आली आहे.

हेही वाचा: Drugs Case: आर्यन खान चार वर्षांपासून घेत होता ड्रग्ज

''आर्यन खानसह तिन्ही आरोप नेहमी एका ड्रग्स तस्काराकडून ड्रग्स घेत होते. आरोपीच्या मोबाईलमधून ड्रग्ससंद्रभातील चॅट सापडले आहे. यृत्यामधून धक्कायदायक माहिती पुढे आली असून काही जणांची नावे देखील समोर आली आहेत. त्यांची चौकशी करणे गरजेचे आहे. आरोपी हे विदेशातील नागरिकांच्या संपर्कात असून त्यांची चौकशी करणे गरजेचे आहे.'' त्यामुळे एनसीबीकडून तिन्ही आरोपींचा एनसीबी कोठडीची मागणी करण्यात आली होती.

दरम्यान, 'आरोपीच्या वकिलांनी युक्तीवाद करत आर्यनला पार्टीसाठी निमंत्रण दिलं होतं. आर्यन कुठल्याही ड्रग्स तस्करांच्या संपर्कात नव्हता. आर्यनकडे काहीही सापडलेलं नाही. अरबाज त्याचा मित्र असून दोघेही एकमेकांना ओळखतात, असे म्हटले आहे. आर्यनकडून ड्रग्ज खरेदी आणिविक्रीबाबत काही पुरावे एनसीबीला मिळालेले नाहीत. तसेच कुठल्याही ड्रग्स तस्कराशी आर्यनचे काहीही संबध नाहीत', असा युक्तीवाद आर्यनच्या वकिलांनी केला होता. मात्र, न्यायालयाने दोन्ही वकिलांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर आर्यन खानसह तिन्ही आरोपींना एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी या ड्रग्स प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर काही धागेदोरे आहेत का? हे एनसीबीकडून तपासण्यात येणार आहे.

loading image
go to top