
मी तेंडुलकर नाही,धोनी आणि कोहलीही नाही,मग माझ्यावर चित्रपट का ? प्रवीण तांबे
सचिन तेंडुलकर,धोनी,विराट कोहली ही क्रिकेटच्या क्षेत्रातील दिग्गज नावे आहेत असं म्हणायला हरकत नाही.या क्रिकेटरच्या जीवनावर दमदार असे चित्रपटही निघाले आहेत.या चित्रपटांतून प्रेक्षकांनी उत्तम प्रेरणा घेतली आहे.प्रवीण तांबे हे देखिल क्रिकेटशी निगडित नाव आहे.जेव्हा या व्यक्तीच्या जीवनावर चित्रपट काढण्याची दिग्दर्शकाने त्याला कल्पना सुचवली तेव्हा त्याची यावर सुरूवातीची प्रतिक्रिया धक्कादायीच होती.
प्रवीण तांबे हे क्रिकेट क्षेत्रातीलच एक नाव.या व्यक्तीने वयाच्या ४१ व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि आयपीएल पदार्पण करणारा प्रवीण सर्वात वयस्कर खेळाडू ठरला.प्रवीण तरुण असताना त्याला वेगवान गोलंदाज व्हायचे होते पण ओरिएंट शिपिंगचा कर्णधार अजय कदम यांनी त्याला लेगस्पिन गोलंदाजी करण्यास सांगितले.प्रवीणच्या आयुष्यातील एक महत्वाचा ट्वीस्ट म्हणजे प्रवीण कधी त्याच्या शहरासाठी क्रिकेट खेळला नव्हता पण त्याला उशीरा का होईना भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली होती.भरपूर संघर्षानंतर त्याने भारतीय टिममधे प्रवेश मिळवलाय.

त्याच्या बायोपिकवर आधारित 'कौन प्रवीण तांबे' हा चित्रपट बघितल्यानंतर त्याला त्याच्या सहकाऱ्यांनी मिठी मारली.खरं तर जेव्हा पहिल्यांदा प्रवीणला त्याच्या जीवनावर चित्रपट काढण्याची दिग्दर्शकाने त्याला कल्पना सुचवली होती तेव्हा त्याची पहिली प्रतिक्रिया होती ती,"मी तेंडुलकर, धोनी किंवा कोहली नाही, त्यांना माझ्यावर चित्रपट का काढायचा आहे?"जयप्रद देसाई यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे तसेच श्रेयस तळपदे या अभिनेत्याने चित्रपटात प्रवीण तांबेची भूमिका साकारली आहे.
मुंबईच्या एका हॉटेलमधे कोलकाता नाईट रायडर्ससाठी आयोजित केलेल्या विशेष स्क्रिनींगमधे 'कौन प्रवीण तांबे' हा चित्रपट दाखवण्यात आला होता.अभिषेक नायर,श्रेयस अयर आणि अनेक खेळाडू त्याठिकाणी उपस्थित होते.त्याचा चित्रपट बघून सगळे भाऊक झालेत आणि त्याला मिठी मारली.प्रवीण सुद्धा यावेळी भाऊक झाला होता.त्याचा हा चित्रपट ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर म्हणजेच डिजनी हॉटस्टारवर प्रदर्शित झालाय.एका मुलाखतीत बोलताना त्याला त्याचा अभिप्रायही त्यावेळी मांडता आला नाही.त्याला काय बोलावे कळतच नव्हते.एका वृत्तपत्राशी बोलताना,तुमच्या स्वप्नांना पुर्ण करण्यासाठी मेहनत घ्या आणि पुढे जा एवढेच तो बोलू शकला.