Shikhar Dhawan: हुमा कुरेशी आणि शिखर धवनची रंगली चर्चा, रोमॅंटिक फोटो व्हायरल, वाचा सविस्तर...

सध्या हुमा कुरेशी तिच्या 'डबल एक्सएल' सिनेमामुळे चर्चेत होती पण आता शिखर धवनसोबतच्या रोमॅंटिक फोटोनं चर्चेला उधाण आलं आहे.
Cricketer Shikhar Dhawan to be seen with huma qureshi, romantic Photo viral,read details
Cricketer Shikhar Dhawan to be seen with huma qureshi, romantic Photo viral,read detailsGoogle
Updated on

Shikhar Dhawan: सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी यांचा 'डबल एक्सएल' सिनेमा त्याच्या कथानकामुळे रिलीज आधीपासूनच बराच चर्चेत आहे. शरीरानं वजनदार महिला आणि त्यांची स्वप्न यावर भाष्य करणाऱ्या या सिनेमानं लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. आता या सिनेमाविषयी एक मोठी बातमी समोर येत आहे. बातमी आहे की,या सिनेमाशी आता शिखर धवनचे नाव जोडले गेले आहे. आणि हे पाहून आता चाहत्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. (Cricketer Shikhar Dhawan to be seen in sonakshi and huma qureshi double Xl Movie.)

सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी अभिनित 'डबल एक्सएल' चा टीझर रिलीज झाल्यानंतर नुकताच सिनेमाचा फर्स्ट लूकही रिलीज करण्यात आला. या मोशन पोस्टरमध्ये स्टेडियममध्ये माइक घेऊन हुमा कुरेशी नजरेस पडतेय. आता मेकर्सनी प्रेक्षकांना आणि चाहत्यांना मोठं सरप्राइज दिलं आहे,जे क्रिकेट वेड्या प्रेमींसाठी सेलिब्रेशनपेक्षा कमी नसेल. या सिनेमाशी आता शिखर धवन जोडला गेला आहे. आणि बोललं जात आहे की, 'डबल एक्सएल' मध्ये तो पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

शिखर धवननं देखील या सिनेमातील आपल्या स्पेशल रोलविषयी बातचीत केली आहे. तो म्हणाला की,''सिनेमात काम करण्याचा निर्णय त्यानं खूप सहज घेतला. एक खेळाडू म्हणून मी नेहमी देशासाठी खेळतो. आयुष्य नेहमीच यामुळे खूप बिझी आहे. पण कधी-कधी स्वतःचं मनोरंजन करणं देखील गरजेचं आहे. आणि मी माझं ते मनोरंजन माझे आवडीचे सिनेमे पाहून करतो. आणि जेव्हा माझ्याकडे या सिनेमाची ऑफर आली तेव्हा मी सर्वप्रथम सिनेमाची संपूर्ण कथा ऐकली आणि त्याचा माझ्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला. हा सिनेमा म्हणजे संपूर्ण समाजासाठी एक चांगली शिकवण ठरेल. मला आशा वाटते की खूप तरुण मुलं आणि मुली आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटतील हा सिनेमा पाहिल्यानंतर''.

Cricketer Shikhar Dhawan to be seen with huma qureshi, romantic Photo viral,read details
Amitabh Property: अमिताभचं मृत्यूपत्र, करोडोंची संपत्ती,घर,नेट वर्थ... जाणून घ्या याविषयी

सतराम रमानी दिग्दर्शित 'डबल एक्सएल' हा सिनेमा ४ नोव्हेंबर,२०२२ रोजी प्रदर्शित होत आहे. या सिनेमात हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हा सोबत शिखर धवन,जहीर इकबाल,महत राघवेंद्र दिसणार आहेत. सिनेमाचे निर्माता भूषण कुमार,विपुल शाह, राजेश बहल,साकिब सलीम,मुद्दस्सर अजीज आणि हुमा कुरेशी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com