'साहो' चा रिव्ह्यु नकारात्मक, जाणून घ्या काय आहे क्रिटिक्स !

वृत्तसंस्था
Thursday, 29 August 2019

बुधवारी 'साहो' ची स्क्रिनिंग  UAE मध्ये करण्यात आली असुन या चित्रपटाविषयी अनेक रिव्ह्यु समोर येत आहेत. या स्क्रिनिंगला उपस्थित चित्रपटाच्या रिव्ह्युचं विश्लेषण करणाऱ्या काही जाणकारांनी 'साहो' ला चार स्टार दिले आहेत.

मुंबई : साऊथचा सुपरहिरो प्रभास आणि बॉलिवुडची अभिनेत्री श्रद्धा कपूर यांचा बहुचर्चित चित्रपट 'साहो' याची गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षक वाट पाहत आहेत. बुधवारी 'साहो' ची स्क्रिनिंग UAE मध्ये करण्यात आली असुन या चित्रपटाविषयी अनेक रिव्ह्यु समोर येत आहेत. या स्क्रिनिंगला उपस्थित चित्रपटाच्या रिव्ह्युचं विश्लेषण करणाऱ्या काही जाणकारांनी 'साहो' ला चार स्टार दिले आहेत.

अॅक्शन आणि थ्रिल असणाऱ्या या सिनेमाचं प्रचंड कौतुक केलं आहे. एकीकडे सिनेमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असला तरी मात्र दुसरीकडे नकारात्मक मतं पाहायला मिळत आहेत. थेट परदेशातून आलेल्या क्रिटिक्सच्या मते 'साहो' बोरिंग असल्याचं सांगितलं जात आहे. 

फक्त परदेशातील जाणकारांनी नकारात्मक मत मांडलं नसुन भारतीय सिनेमा वितरकानेही असाच काहीसा प्रतिसाद दिला आहे. चित्रपटामधलं प्रभासचं हिंदी डबिंग, मुख्य भुमिकेत असलेल्या अभिनेत्री श्रद्धा कपूरची एकंदरीत कामगिरी  यावर त्यांनी टीका केली आहे.

UAE च्या एका फिल्म क्रिटिकने आपलं मत मांडताना सांगितलं की, चित्रपटामध्ये केवळ अॅक्शनच जास्त पाहायला मिळत आहे आणि त्याची कथा मजबुत नाही. स्क्रिनप्ले आणि खलनायक यांच विश्लेषण करताना 'साहो' रटाळवाणा असल्याचं सांगितलं जात आहे. चित्रपटामध्ये फक्त प्रभास आणि अॅक्शन सिन यांच्यावरच जास्त भर दिला गेला आहे. 

दुबईमधील पत्रकार उमेर संधू यांनी मात्र चित्रपटाचं कौतुक केलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून मत व्यक्त करताना त्यांनी लिहिलं, ''पहिला रिव्ह्यु प्रभास आणि श्रद्धा यांच्या दमदार केमिस्ट्रीसाठी.अॅक्शन या सिनेमाचा USP आहे. प्रभासच्या स्टंटसाठी स्टैंडिंग ओवेशन. डायलॉग चांगले आहेत. लोकांचं मनोरंजन करण्यासाठी 4 स्टार".

 

भारतामध्ये 30 ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रभासने या चित्रपटासाठी दोन वर्षे दिली होती तर, या चित्रपटाचं एकुण बजेट 350 करोड इतकं होतं. समोर आलेल्या रिव्ह्युनंतर आता हे पाहावं लागेल की, भारतामध्ये 'साहो' ला कशाप्रकारचा प्रतिसाद मिळतो !
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: critics giving negative reviews about sahoo