बाबो! राघू पिंजऱ्यात आला.. 'दगडी चाळ २' मधील भन्नाट गाणं लावतंय वेड.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

daagdi chaawl 2 movie raghu pinjryat ala song released ankush chaudhari pooja sawant makarand deshpande cast release date

बाबो! राघू पिंजऱ्यात आला.. 'दगडी चाळ २' मधील भन्नाट गाणं लावतंय वेड..

Dagadi chawl 2 : 'दगडी चाळ २' हा चित्रपट येणार असल्याचे समजल्यापासूनच यातील प्रमुख व्यक्तिरेखा कोण साकारणार, याची सर्वच प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती आणि नुकतेच यातील प्रमुख चेहरे आपल्या समोर आले. आता या चित्रपटातील पहिले आणि जबरदस्त गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

(daagdi chaawl 2 movie raghu pinjryat ala song released ankush chaudhari pooja sawant makarand deshpande cast release date)

' राघू पिंजऱ्यात आला ' असे या गाण्याचे बोल असून " डेझी शाह " या बॅालिवूडमधील नामांकित चेहऱ्याने या गाण्याच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. अमितराज यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला मुग्धा कऱ्हाडे हीचा आवाज लाभला आहे. तर अवघ्या बॉलीवूडला आपल्या तालावर नाचवणाऱ्या आदिल शेख यांनी या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे. गाण्याचे भन्नाट बोल, डेझीचा सीझलिंग परफॉर्मन्स आणि घायाळ करणाऱ्या तिच्या अदा या सगळ्यामुळे हे गाणे ग्लॅमरस बनले आहे. मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित 'दगडी चाळ २' येत्या १८ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

संगीतकार अमितराज या गाण्याबद्दल म्हणतात, " क्षितिज पटवर्धन यांनी गाण्याचे बोल इतके उत्स्फूर्त लिहिले की, त्याला संगीतही त्याच ताकदीचे लागणार होते. मुग्धानेही या गाण्याला उत्तम न्याय दिला आहे आणि मात्र त्यात अधिक रंगत आणली आहे ती डेझीच्या बहारदार नृत्याने. हे गाणे ऐकताना कोणाचेच पाय जमिनीवर स्थिर राहू शकत नाहीत. सगळ्यांना ठेका धरायला लावणारे हे गाणे आहे." या चित्रपटात मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Web Title: Daagdi Chaawl 2 Movie Raghu Pinjryat Ala Song Released Ankush Chaudhari Pooja Sawant Makarand Deshpande Cast Release Date

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Marathi MoviesDagdi chawl