नवरात्रीच्या तोंडावर गाजतंय 'दार उघड बये'चं शीर्षकगीत! गायिका म्हणते.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

daar ughad baye marathi serial title song get popular zee marathi

नवरात्रीच्या तोंडावर गाजतंय 'दार उघड बये'चं शीर्षकगीत! गायिका म्हणते..

zee marathi : मालिका सुरु होऊन दोनच दिवस झालेत पण मालिकेच्या शीर्षकगीताला आणि कलाकारांना प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसतेय. ‘दार उघड बये’ या मालिकेमध्ये नाशिकच्या अनुजा देवरे हिने 'वरी कोरड आभाळ' हे गाणे गायलं आहे, या मालिकेचे शीर्षकगीत हे हृदय पिळवटून टाकणारे आहे, हे गाणे सध्या प्रेक्षकांची मने जिंकत आहे. (daar ughad baye marathi serial title song get popular zee marathi )

अनुजा देवरे हिने झी मराठी वाहिनीवरील ‘दार उघड बये’ या मालिकेचे शीर्षकगीत गाऊन मराठी संगीत क्षेत्रात दमदार पदार्पण केले आहे. अनुजा बद्दल सांगायचं झालं तर ती शिक्षण आणि गायन असा दुहेरी प्रवास करत आहे. अनुजा म्हणाली कि तिच्या आईचा आणि आजीचा आवाज सुंदर आहे, तिथूनच तिला सर्व प्रेरणा मिळाली. रचना विद्यालयात शिकत असताना तिने इयत्ता दहावी पासून गाण्याच्या मंचावर भाग घेतला. उत्तम गाण्याबद्दल तिच्या शिक्षकांच्या कौतुकाने प्रेरित होऊन अनुजाने आंतरशालेय स्पर्धांमध्ये यश मिळवले. झी मराठीच्या मालिकेमध्ये गाण्याची तिची ही पहिलीच संधी आहे.

सध्या नवरात्रीतचं वातावरण आहे. लवकरच घराघरात घटस्थापना होणार आहे. त्यामुळे देवीची गाणी, तिचा महिमा ऐकण्याकडे प्रेक्षकांचा कल आहे. अशातच झी मराठीच्या 'दार उघड बये' या मालिकेचे भाव भक्तीने भरलेले शीर्षक गीत चांगलेच गाजत आहे. या गाण्याविषयी गायिका अनुजा म्हणते, 'शीर्षक गीताचे संगीतकार विजय कापसे आणि माझी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात भेट झाली. आम्ही दोघांनी तिथे परफॉर्म केले होते. एके दिवशी त्याने मला एक प्रोजेक्टआहे असे सांगून फोन केला आणि त्याने एक गाणं रेकॉर्ड करून पाठवायला सांगितले. नंतर, मी रेकॉर्ड करून पाठवलेला गाणं हर्ष-विजय या दोन्ही संगीतकारांना आवडले आणि मला ही संधी मिळाली. हर्ष- विजय यांनी मला गाण्यातला भाव समजावून सांगितला. गाण्याची पार्श्वभूमी सांगितली आणि पाय थिरकायला लावणारे शीर्षकगीत रेकॉर्ड झाले.'

Web Title: Daar Ughad Baye Marathi Serial Title Song Get Popular Zee Marathi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..