#100DaystoDabangg3 सलमान म्हणतोय, 'स्वागत तो करो हमारा...'

टीम ईसकाळ
Wednesday, 11 September 2019

सलमानने ट्विट केले आहे की, 'दबंग 3 की दिवानगी छायेगी अब कन्नडा में...', 'दबंग 3 होगी अब और टेरेफिक, तेलुगू में!', 'चुलबूल पांडे के साथ लिजिए मजा दबंग 3 का अब तमिळ में... स्वागत तो करो हमारा...' हे ट्विट करून सलमान सर्व भाषांतील दबंग 3 चे मोशन पोस्टर शेअर केले आहेत. 

सलमान खानचा बहुप्रतिक्षीत चित्रपट 'दबंग 3' प्रदर्शनाच्या तयारीत आहे. दबंगची रिलीज डेट 100 दिवसांवर आली असल्याने #100DaystoDabangg3 हा हॅशटॅग व्हायरल होत आहे. सलमानच्या चाहत्यांनी हा हॅशटॅग ट्रेंड केला आहे. यावरून लक्षात येतंय की दबंग3 ची उत्सुकता मोठ्या प्रमाणात आहे. 

सलमाननेही ट्विट करत आज एक नवीन घोषणा केली आहे. 'दबंग 3' हा तमिळ, तेलुगू व कन्नड भाषेतही प्रदर्शित होईल. सलमानने ट्विट केले आहे की, 'दबंग 3 की दिवानगी छायेगी अब कन्नडा में...', 'दबंग 3 होगी अब और टेरेफिक, तेलुगू में!', 'चुलबूल पांडे के साथ लिजिए मजा दबंग 3 का अब तमिळ में... स्वागत तो करो हमारा...' हे ट्विट करून सलमान सर्व भाषांतील दबंग 3 चे मोशन पोस्टर शेअर केले आहेत. 

 

 

दबंग 3 मध्ये महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर झळकणार आहे. दबंग खानचे चाहते या चित्रपटाची उत्कंठेने वाट बघत आहेत. 20 डिसेंबरला दबंग 3 रिलीज होईल.

 

 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dabang 3 will release in 3 languages