esakal | सुशांतच्या आत्महत्येच्या एका आठवड्यानंतर आली सलमानची प्रतिक्रिया; वाचा काय म्हणाला तो...
sakal

बोलून बातमी शोधा

salman on sushant

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतील घराणेशाहीचा मुद्दा चर्चिला जात आहे. सोशल मीडियावर करण जोहर, एकता कपूर, आलिया भट, सलमान खान आदी मंडळींना ट्रोल केले जात आहे.

सुशांतच्या आत्महत्येच्या एका आठवड्यानंतर आली सलमानची प्रतिक्रिया; वाचा काय म्हणाला तो...

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई ः अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतील घराणेशाहीचा मुद्दा चर्चिला जात आहे. सोशल मीडियावर करण जोहर, एकता कपूर, आलिया भट, सलमान खान आदी मंडळींना ट्रोल केले जात आहे. सुशांतच्या मृत्यूसाठी बॉलीवूडमधील घराणेशाहीच जबाबदार आहे, असे आरोप इंडस्ट्रीतील काही मंडळींनी केले आहेत. 

फादर्स डे स्पेशल : 'या' कलाकारांनी व्यक्त केल्या आपल्या वडिलांबद्दलच्या भावना...

अभिनेत्री कंगना रानौतने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करीत हिंदी चित्रपटसृष्टीतील नेपोटिझमवर हल्ला चढविला आहे. अभिनेता सलमान खानवरदेखील जोरदार टीका करण्यात आली. त्यालाही ट्रोलिगचा सामना करावा लागला. आतापर्यंत त्यावर सलमानने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. 

मात्र आता सलमानने आपली प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिली आहे. सलमानने आपल्या ट्विटमध्ये आपल्या चाहत्यांना आवाहन करताना म्हटले आहे, की हा प्रसंग खूप कठीण आहे आणि अशा कठीण प्रसंगांत सुशांतच्या चाहत्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहा. त्यांच्या भाषेकडे दुर्लक्ष करा. आज सुशांतच्या  चाहत्यांना आणि कुटुंबीयांना साथ देण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहा. सलमान खानने अशा प्रकारे ट्विट केल्यामुळे पुन्हा त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे तर सलमानच्या चाहत्यांनी त्याचे कौतुक केले आहे.