dagadi chawl 2: 'दगडी चाळ २' आता पाहा घरच्या टिव्हीवर.. या दिवशी होणार.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dagadi chawl 2 marathi movie world television premiere on pravah picture on 30 october

dagadi chawl 2: 'दगडी चाळ २' आता पाहा घरच्या टिव्हीवर.. या दिवशी होणार..

daagdi chaawl : मुंबईतील गॅंगवॉरमधील सर्वात मोठे नाव म्हणजे 'अरुण गुलाब गवळी' उर्फ 'डॅडी'. त्यांच्या 'दगडी चाळी'वर आधारित 'दगडी चाळ' हा चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. ज्याप्रमाणे डॅडींनी अवघ्या मुंबईवर राज्य केले तसेच या चित्रपटानेही अवघ्या महाराष्ट्रावर राज्य केले. या उदंड प्रतिसादामुळेच ऑगस्ट 2022 मध्ये 'दगडी चाळ २' देखील आला. पहिल्या चित्रपटात सूर्याची लव्हस्टोरी दाखवली होत तर दुसऱ्या भगत सूर्याच्या लग्नानंतरचे जीवन दाखवले होते. या चित्रपटाला देखील प्रचंड प्रतिसाद मिळाला. परंतु आता हा चित्रपट घरबसल्या पाहता येणार आहे.

हेही वाचा: Man Kasturi Re: 'मन कस्तुरी रे' चित्रपटाबाबत त्या रात्री नेमक काय झालं? बघाच..

पावनखिंड, झिम्मा, चंद्रमुखी, कारखानिसांची वारी अश्या अनेक सुपरहिट सिनेमांच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर नंतर प्रवाह पिक्चर वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे आणखी एक ब्लॉकबस्टर सिनेमा अर्थातच दगडी चाळ २. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. आता हा सुपरहिट सिनेमा घरबसल्या म्हणजेच प्रवाह पिक्चर वाहिनीवर पाहायला मिळेल. दिवाळीच्या धामधुमीत म्हणजेच ३० ऑक्टोबरला दुपारी १ वाजता प्रवाह पिक्चरवर दगडी चाळ २ चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे.

चुकीला माफी नाही असं ठणकावून सांगणारे डॅडी, डॅशिंग सूर्या आणि धीरगंभीर सोनल हे त्रिकुट साकारणारे कलाकार अर्थातच मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांनी दगडी चाळ २ मध्येही दमदार भूमिका साकारल्या आहेत. चंद्रकांत कणसे यांनीच दगडी चाळ २ चं ही दिग्दर्शन केलं आहे.

टॅग्स :Marathi Movies