esakal | बिनधास्त अन् बोल्ड निधीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा

बोलून बातमी शोधा

Dazzling hot photoshoot of bollywood actress Nidhhi Agerwal
बिनधास्त अन् बोल्ड निधीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - नव्यानं बॉलीवूड आणि टेलिव्हिजन क्षेत्रात आलेल्या सेलिब्रेटींनी सोशल मी़डियाच्या आधारे आपली पॉप्युलिरिटी करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक सेलिब्रेटीसाठी सोशल मीडिया हा त्या सेलिब्रेटीच्या पीआरसाठी महत्वाचा भाग ठरतो आहे. आता तर अनेकजण त्यांच्या आयुष्यातील छोट्या मोठ्या गोष्टीही सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. यानिमित्तानं आपली लोकप्रियता वाढावी आणि आपण जास्तीत जास्त लाईमलाईटमध्ये चर्चिले जाऊ. असा त्यामागील उद्देश असल्याचे दिसून आले आहे. त्यात अभिनेत्यांबरोबरच अभिनेत्रींचाही मोठा सहभाग आहे. विशेषत अभिनेत्रींचे फोटोशुट चाहत्यांच्या आवडीचा विषय असतो.

सध्या बॉलीवूडची अभिनेत्री निधी अग्रवाल ट्रेडिंगचा विषय आहे. याचे कारण तिचे हॉट फोटोशुट. ते सर्वांच्या पसंतीस पडले आहे. अवघ्या काही मिनिटांत त्याला शेकडो लाईक्स आले आहेत. निधी अग्रवाल ही तिच्या हॉट फोटोसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे. तिनं 2017 मध्ये मुन्ना मायकल नावाच्या चित्रपटापासून आपल्या बॉलीवूड प्रवासाला सुरुवात केली होती. त्या चित्रपटात तिच्या अपोझिट टायगर श्रॉफनं काम केलं होतं. मात्र त्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर फार कमाई केली नव्हती. त्यानंतर तिनं अक्किनेनी भावांसोबत दोन तेलुगु भाषेतील चित्रपटात काम केले होते.

निधीचे आताचे फोटोशुट सर्वांच्या कौतूकाचा विषय आहे. त्यानिमित्तानं सध्या ती ट्रेडिंगचा विषय आहे. काही दिवसांपूर्वी तिनं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, मी आता बॉलीवूडच्या काही फिल्म साईन केल्या आहे.त्याच्या चित्रिकरणाला यापुढील दिवसांत सुरुवात होणार आहे. मला वाटतं स्क्रिप्ट चांगली असल्यास तो चित्रपट करायला हरकत नाहीये. त्याविषयी मी ऑफिशियली त्याबाबत घोषणा करणार आहे.

26 वर्षांची असणारी निधी बंगळुरुची आहे. ती कथ्थक आणि बॅले डान्समध्ये प्रसिध्द आहे. याशिवाय तिनं बिझनेस मध्ये पदवी घेतली आहे. निधीनं मुन्ना मायकल चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एंट्री केली होती.