December 2023 OTT Web Series Release: डिसेंबरमध्ये 'ओटीटी' वर नवीन काय येणार, तुमची 'वॉच लिस्ट' अपडेट केलीय?

येत्या डिसेंबर महिन्यात मनोरंजन विश्वात अनेक मोठ्या बॅनरच्या कलाकृती थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहेत.
December 2023 OTT Web Series
December 2023 OTT Web Seriesesakal

December 2023 OTT Web Series : येत्या डिसेंबर महिन्यात मनोरंजन विश्वात अनेक मोठ्या बॅनरच्या कलाकृती थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहेत. याशिवाय ओटीटीवरही देखील विविध मालिका, चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे.

डिसेंबरमध्ये नव्यानं कोणत्या सीरिज आणि चित्रपट वेबसीरिजवर येणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात ओटीटीच्या चाहत्यांना आगळी वेगळी मेजवानी ओटीटी निर्मात्यांकडून मिळणार आहेत. यात केवळ इंग्रजीच नाहीतर हिंदी आणि इतर भारतीय भाषांमधील कलाकृती प्रदर्शित होणार आहे.

राजस्थान निवडणुकीत महिला, सिलेंडर आणि जातीय मुद्दा.! (Rajasthan Assembly Election 2023 )

नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम, डिझ्नी हॉटस्टार आणि झी ५ वर प्रदर्शित होणाऱ्या मालिका, चित्रपट यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. थिएटरमध्ये रणबीर कपूर, विकी कौशल, शाहरुख खान आणि प्रभास या सेलिब्रेटींचे बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज असणार आहेत. याशिवाय ओटीटीवरही विविध मालिका आणि बॉलीवूड, हॉलीवूडचे चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहेत.

१. धूथा - साऊथमधील ही सस्पेंस थ्रिलर हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत १ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणाऱ्या या मालिकेमध्ये नागा चैतन्य हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. एका पत्रकाराचा मृत्यू आणि त्याचा शोध या भोवती ही मालिका फिरते.

२. मिशन रानीगंज - बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा हा चित्रपट १ डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. त्यात परिणीती चोप्राची मुख्य भूमिका आहे. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटानं मोठी कमाई केली होती.

३. द आर्चिच - शाहरुखच्या लाडक्या लेकीचा अन् अमिताभ बच्चन यांच्या नातवाचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असा द आर्चिच ७ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून सुहाना खान बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे. दुसरीकडे शाहरुखचा डंकी देखील २१ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

४. चमक - सोनी लिव ओटीटीवर चमक नावाची म्युझिकल थ्रिलर प्रदर्शित होणार आहे. पंजाब संगीत विश्वामध्ये काय काय घडामोडी होतात हे या मालिकेच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे. सात डिसेंबर रोजी ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

५. कडक सिंग - प्रसिद्ध अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्या तगड्या अभिनयाचा कडक सिंग झी ५ वर येत्या ८ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. याशिवाय त्यांच्या अटल नावाच्या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे.

६. द फ्री लान्सर सीझन १द कन्क्ल्युझन - डिझ्नी हॉटस्टारवर प्रदर्शित होणारी ही सीरिज अॅक्शन थ्रिलर या प्रकारातील आहे. त्यात एकुण पंधरा एपिसोड आहेत. त्यात मोहित रैना, कश्मिरा परदेशी, अनुपम खेर यांच्या मुख्य भूमिका आहेत.

December 2023 OTT Web Series
The Archies Trailer : आर्यन नाही पण 'सुहाना' चमकली! शाहरुखच्या लेकीचा 'द आर्चीज' चा ट्रेलर पाहिलाय? अभिनयाचं होतंय कौतुक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com