esakal | दीपिकाचा नवा हॉलिवूड सिनेमा ?
sakal

बोलून बातमी शोधा

Deepika to appear in new Hollywood movie

सुपरस्टार विन डीजलसोबत दीपिका 'सेरेना' च्या भूमिकेत दिसली. दीपिका पुन्हा एकदा हॉलिवूडमध्ये नव्या चित्रपटातून दिसणार असल्याची चर्चा सुरु आहे. 

दीपिकाचा नवा हॉलिवूड सिनेमा ?

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये एन्ट्री करणं काही सोप्पं काम नाही. पण उत्तम कामगिरीने बॉलिवूडच्या अनेक कलाकरांनी हॉलिवूडमध्येही आधिराज्य गाजवलं आहे. बी-टाउनमधील सध्याची टॉपची अभिनेत्री दीपिका पदुकोनने 'XXX: Return of The Xander Cage' या सिनेमासह हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सुपरस्टार विन डीजलसोबत ती 'सेरेना' च्या भूमिकेत दिसली. दीपिका पुन्हा एकदा हॉलिवूडमध्ये नव्या चित्रपटातून दिसणार असल्याची चर्चा सुरु आहे. 

बॉलिवूडचा किंग खान शाहरुखसोबत दीपिकाने 'ओम शांती ओम' मधून डेब्यू केलं. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे करत दीपिकाने अभिनयाची वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. पुन्हा एकदा दीपिका हॉलिवूडच्या चित्रपटातून दिसणार आहे. 'XXX: Return of The Xander Cage' याच चित्रपटाच्या पुढच्या भागामध्ये ती दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

XXX 4 म्हणजेच 'जेंडर केज 4' चा भाग दीपिका असू शकते. 'फास्ट अॅण्ड फ्युरिअस' चा प्रसिद्ध अभिनेता विन डीजलने इन्स्टाग्रामवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना विनने कॅप्शन दिलं आहे, ' क्रिएटीविटीचं कौतुक करा. जेंडर केजच्या मिटींगला मी गेलो होतो. प्रत्येक  फ्रैंचाइजीची एक कुटुंब असू शकते. मी स्वत:ला नशिव़बवान समजतो.' या कॅप्शनमध्ये विनने जेंडर केजचा उल्लेख केला आहे. विशेष म्हणजे त्याने वापरलेल्या हॅशटॅगमध्ये #deepikapadukone #Liveforthis #XanderCage4  हे टॅग वापरण्यात आले आहेत. दीपिका पदुकोनच्या टॅगमुळे चर्चेला उधाण मिळाले आहे. 

अजुनही कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी सर्वत्र याचीच चर्चा पाहायला मिळत आहे. 

दीपिका सध्या तिचा बहुचर्चित आगामी सिनेमा 'छपाक' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलिज झाला असून प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. पुढच्या वर्षी 20 जानेवारी 2020 ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

loading image
go to top