esakal | दीपिका होणार आई? रणवीरने दिली अशी प्रतिक्रिया...
sakal

बोलून बातमी शोधा

Is deepika going to be a mom ?

दीपिका आणि रणवीरच्या लग्नानंतर ते कधी 'गुड न्युज' देणार य़ाची उत्सुकता चाहत्यांमध्ये दिसून येतेय. काही दिवसापूर्वी दीपिकाने इन्स्टाग्रामवर लहान बाळाचे फोटो शेअर केले. आणि...

दीपिका होणार आई? रणवीरने दिली अशी प्रतिक्रिया...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडी म्हणजे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग. २०१८ मध्ये लग्न केलेल्या या जोडीची कायमच चाहत्यांमध्ये चर्चा रंगत असते. त्यामुळे त्यांच्याविषयी कोणतीही माहिती समोर आली की लोकांमध्ये नेहमीच उत्सुकता दिसून येते. आताही अशाच एका खास कारणाने दीपिका पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. 

दीपिका आणि रणवीरच्या लग्नानंतर ते कधी 'गुड न्युज' देणार य़ाची उत्सुकता चाहत्यांमध्ये दिसून येतेय. काही दिवसापूर्वी दीपिकाने इन्स्टाग्रामवर लहान बाळाचे फोटो शेअर केले. त्यामुळे दीपिका आई होणार का? असा प्रश्न चाहत्यांमध्ये निर्माण झाला आहे. यावर  वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा देखील रंगत आहेत. त्यातच या फोटोवर रणवीरने जी कमेंट केली ती पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये खरोखरचं संभ्रम निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. हा फोटो पाहून चाहते क्रेझी झाले आणि त्यांनी या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

त्याचं झालं असं, दीपिकाने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एका लहान मुलाचे फोटो शेअर केले होते. 'दिवाळीनंतरचं सेलिब्रेशन' असं कॅप्शनही दीपिकाने या फोटोला दिलं होतं. त्यामुळे दीपिका आई होणार का? अशीही चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली. दीपिकाचा पती रणवीर य़ामध्ये मागे राहिला नाही आणि त्यानेही एक भन्नाट कमेंट केली.  त्याने एक हार्टशेपची इमोजी शेअर करत कमेंट केली आहे. त्याची ही कमेंट पाहिल्यानंतर चाहत्यांना खरंच प्रश्न पडला आहे. मात्र हे फोटो दीपिकाच्य लहानरपणीचे आहेत.लहानपणीच्या काही गोड आठवणी तिने सोशल मीडिय़ावर शेअर केल्या. 

दीपिका सध्या मेघना गुलजारच्या 'छपाक' या आगामी चित्रपटामधून प्रेक्षकांना भेटणार आहे. अॅसिडस हल्ला पीडिता लक्ष्मी अगरवाल हिच्या भूमिकेत दीपिका दिसणार आहे. त्याचा पोस्टरही तिने काही दिवसांपूर्वी शेअर केला आहे. रणवीर आणि दीपिका यांनी संजय लीला भव्साळी यांच्या रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या तीन चित्रपटांमधून एकत्र काम केले. लग्नानंतर पहिल्यांदाच ही जोडी 83 या चित्रपटामधून एकत्र दिसणार आहे.हा सिनेमा 1983 मध्ये भारतीय क्रिकेट टीमनं मिळवलेल्या विश्वचषक विजयावर आधारित आहे.

loading image
go to top