
हॉलीवूडमध्ये दीपिकाच्या हिंदीच्या क्लासला मोठा डिमांड;पहा झलक...
दीपिका पदूकोणला(Deepika Padukone) नुकतंच आपण '83' मध्ये पाहिलं. भूमिका छोटी असली तरी नेहमीप्रमाणेच तिनं ती चोख केलीय. ती सिनेमात काम करताना केवळ तिच्या दिसण्यानं नाही तर तिच्या अभिनयातनंही आपली छाप सोडून जाते. त्यात रणवीर सिंगची ऑफिशियल बायको झाल्यानंतर दोघांना '83' मध्ये एकत्र नवरा बायको म्हणून पाहणं अर्थातच त्यांच्या चाहत्यांसाठी ही एक सुखद गोष्ट म्हणाली लागेल. दीपिका ही नेहमीच सोशल मीडियावरील तिनं शेअर केलेल्या एखाद्या पोस्टच्या माध्यमातनं किंवा मग एखाद्या व्हिडीओच्या माध्यमातनं किंवा तिच्या एखाद्या स्टेटमेंटच्या माध्यमातून चर्चेत येतच असते. आता सध्या तिचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय,जो तिच्या हॉलीवूडच्या एका सिनेमाच्या सेटवरचा आहे. जिथे बाईंनी थेट हॉलीवूडकरांना हिंदीचे पाठच द्यायला सुरुवात केली होती.
हेही वाचा: कोरोनानं '83' ची विकेट काढल्यानं निर्मात्यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय
तर हा व्हिडीओ आहे तो दीपिकाच्या विन डिसेल या प्रसिद्द हॉलीवूड स्टारसोबत काम केलेल्या 'ट्रिपल एक्स 4' च्या सेटवरचा. 'ट्रिपल एक्सः-रिटर्न ऑफ जेंडर केज' या सिनेमात दीपिका पदुकोण आणि विन डिजेलची जोडी दिसली होती. या सिनेमानंतर विन जणू दिपिकाच्या प्रेमात पडला होता. दीपिका असेल तर मी बॉलीवूडच्या सिनेमातही काम करायला तयार आहे असं तो मागे म्हणालाही होता. आता असे असताना 'ट्रिपल एक्स- रिटर्न ऑफ जेंडर केज' या सीक्वेलमध्ये दीपिकाची वर्णी लागणार नाही असे कसे होईल. ट्रिपल एक्स सीरीजच्या चौथ्या भागातही ती होती. त्यात दीपिकाची महत्त्वपूर्ण भूमिका होती. 'ट्रिपल एक्स- रिटर्न ऑफ जेंडर केज' मध्ये दीपिकाने सेरेना उंगरची व्यक्तीरेखा साकारली होती. सिनेमाने फार कमाई केली नव्हती. पण यातील दीपिकाच्या कामाचे कौतूक झाले होते. त्यामुळे त्याच्या सिक्वेलमध्ये संपूर्ण स्टारकास्ट रिपीट करण्यात आली होती.
यु ट्युब वरील हा व्हिडीओ काही वर्षांपूर्वीचा आहे पण एंटरटेनिंग आहे.
आता त्या सिनेमाच्या सेटवर विन नं दिपिकाकडून हिंदीचा क्लासच घ्यायला सुरुवात केली. आणि बिचारा अगदी शिस्तीने दीपिका जे बोलायला सांगत होती ते बोलत होता. खोटं वाटत असेल तर पहा,इथे व्हिडीओ जोडलाय आम्ही. आता दीपिका बाईंनी 'फास्टअॅन्ड फ्युरीयस'च्या अॅकटरच्या स्पीडला ब्रेकच लावला न. पहा ब्रेक लावत लावत हिंदी बोलणारा विन आणि आपली सुंदर प्रेमाने शिकवणारी हिंदीची टीचर दीपिका म्हणजे बेस्टच कॉम्बिनेशन नाही का.
Web Title: Deepika Padukon Turn Into Hindi Teacherhollywood Star Become Her First Student Entertainment
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..