Video : दीपिकाला प्रत्यक्ष पाहिलं अन् उलटी आली...

वृत्तसंस्था
Monday, 26 August 2019

भारतीय अभिनेत्री दीपिका पदुकोण हिला प्रत्यक्ष पाहिले, त्यावेळी अक्षरशः मला उलटी आली होती. प्रियांका चोप्राला पाहिल्यानंतर किळस वाटली होती.

कराचीः भारतीय अभिनेत्री दीपिका पदुकोण हिला प्रत्यक्ष पाहिले, त्यावेळी अक्षरशः मला उलटी आली होती. प्रियांका चोप्राला पाहिल्यानंतर किळस वाटली होती, असे पाकिस्तानचा निवेदक वकार जका याने म्हटले असून, सोशल मीडियावर तसा व्हिडिओ शेअर केला आहे.

वकार जका याने इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यावर त्याने भारतीय कलाकारांवर टीका केली आहे. शिवाय, पाकिस्तानमध्ये जाहिरातींवर भारतीय अभिनेत्रींचे छायाचित्रे लावू नयेत, अशी विनंती त्याने पाकिस्तानच्या पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे केली आहे.

पाकिस्तानमध्ये रेडिओ जॉकी असलेला वकार म्हणाला, 'मोठ्या कंपन्यांना पाकिस्तानमध्ये व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी कृपा करुन जाहिरात करण्यासाठी भारतीय अभिनेत्रींचे छायाचित्र लावू नयेत. पाकिस्तानच्या पंतप्रधानांना माझी विनंती आहे की, पाकिस्तानमध्ये भारतीय अभिनेत्रींची छायाचित्रे असलेल्या जाहिराती काढून टाकण्यासाठी उपाय करावेत. भारतीय अभिनेत्रींमध्ये दीपिका पदुकोणला पाहिले तर मला उलटीसारखे होते. मी, ज्यावेळी दीपिकाला प्रत्यक्षात समोरुन पाहिले होते, तेव्हा मला अक्षरश: उलटी आली होती. प्रियांकाला पाहिल्यानंतर तर अत्यंत किळस वाटली होती.'

दरम्यान, वकारने शेअर केलेल्या व्हिडिओवर नेटिझन्स टीका करू लागले असून, तो ट्रोल झाला आहे. भारताने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. विविध स्तरांवरून ते टीका करताना दिसतात. यामधूनच त्यांनी भारतीय अभिनेते व अभिनेत्रींवर टीका करून चर्चेत येण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा प्रतिक्रिया नेटिझन्स व्यक्त करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: deepika padukone and priyanka chopra statement Pakistani TV Host Waqar Zaka