'संजय लीला भन्साळीशी लग्न करायचं होतं, पण...' दीपिका काय बोलून बसली! | Deepika Padukone Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deepika Padukone Video

Deepika Padukone Video : 'संजय लीला भन्साळीशी लग्न करायचं होतं, पण...' दीपिका काय बोलून बसली!

Deepika Padukone Video Viral : बॉलीवूडची मस्तानी म्हणून जिला ओळखले जाते त्या दीपिकावर सध्या कौतूकाचा वर्षाव होताना दिसतो आहे. त्याला कारण किंग खानसोबतचा तिचा पठाण चित्रपट.पठाणनं आता बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम रचले आहेत. ज्या चित्रपटावर प्रदर्शित होण्यापूर्वी बहिष्काराची भाषा करण्यात आली होती त्या पठाणनं विक्रमी कमाई करुन टीकाकारांना जशास तसे उत्तर दिले आहे.

दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकीनीवरुन सुरु झालेला तो वाद फार काळ टिकला नाही. पठाणनं वाद निर्माण करणाऱ्यांना चांगलेच सुनावले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पठाणनं आता एस एस राजामौली यांच्या आरआरआरचे देखील रेकॉर्ड मोडले आहे. त्यामुळे दीपिका देखील लाईमलाईटमध्ये आली. तिचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे.

Also Read - ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळींचे दीपिकाच्या बॉलीवूड करिअरमध्ये मोठा वाटा आहे. त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये तिनं महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यात रामलीला, बाजीराव मस्तानी, पद्मावत या चित्रपटांची नावं सांगता येतील. आता भलेही रणवीर सिंग सोबत दीपिकानं वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली असेल मात्र एका कार्यक्रमामध्ये दीपिकानं आपल्याला त्याच्यासोबत लग्न करायचे नव्हते. असे सांगून चाहत्यांना धक्का दिला आहे.

दीपिकानं म्हटले आहे की, मला रणवीर नव्हे तर संजय लीला भन्साळीसोबत लग्न करायचे होते. त्याचं झालं असं बिग बॉसच्या अकराव्या सीझनच्या प्रमोशनसाठी दीपिका बिग बॉसच्या सेटवर गेली होती. तेव्हा सलमाननं तिला काही गंमतीदार प्रश्न विचारले होते. त्यावर तिनं दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे. मला रणवीर सोबत डेटला जायला आवडेल. मात्र मी लग्न संजय भन्साळींशी करेल. असे दीपिकानं सांगितले होते.

दीपिकाचं ते बोलणं ऐकल्यानंतर सलमाननं लगेच तिला सल्ला दिला. तू म्हणते तसं जर झालं असतं तर ते लग्न काही टिकलं नसतं. असे सांगून सलमाननं उपस्थितांची दाद मिळवली होती. संजय लीला भन्साळी यांचे वय ५९ असून ते अविवाहीत आहे. त्यामुळे दरम्यानच्या काळात एका वेगळ्या चर्चेला उधाण आले होते.