गूड न्यूज! दीपिका-रणवीरला म्हणाली हाय डॅडी....

वृत्तसंस्था
Saturday, 17 August 2019

रणवीर सिंगने आपल्या फॅन्सासाठी सोशल मीडियावर लाईव्ह केले होते. रणवीरच्या फॅन्सने यावर कमेंट करायला सुरुवात केली. यातच अचानक दीपिकाची एक कमेंट आली, कमेंटमध्ये तिने 'हाय डॅडी' असे लिहिले होते. तिची ही कमेंट बघून सगळ्या फॅन्सचे डोळे विस्फारले. 

बॉलीवूडमधलं लाडकं कपल दिपवीर अर्थात दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंग पुन्हा एकदा एका खास कारणामुळे चर्चेत आलंय. दीपिका-रणवीरकडे गूड न्यूज आहे की, काय अशी चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. त्याला कारणही तसंच आहे...   

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Story of my Life Real & Reel ! @deepikapadukone @83thefilm

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

रणवीर सिंगने आपल्या फॅन्सासाठी सोशल मीडियावर लाईव्ह केले होते. रणवीरच्या फॅन्सने यावर कमेंट करायला सुरुवात केली. यातच अचानक दीपिकाची एक कमेंट आली, कमेंटमध्ये तिने 'हाय डॅडी' असे लिहिले होते. तिची ही कमेंट बघून सगळ्या फॅन्सचे डोळे विस्फारले. 

दीपिकाच्या कमेंटनंतर अभिनेता अर्जून कपूरनेही 'Baba Bhabi gonna give u one.' अशी कमेंट केली. यामुळे त्यांच्या गूड न्यूजचा संशय आणखीनच बळावला. 

दीपिकाच्या या कमेंटमुळे तिच्या नुकताच झालेल्या कान्सचा आठवण झाली. कान्स 2019चे फोटो पाहून दीपिका पादुकोण प्रेग्नेंट असल्याचा अंदाज तिच्या फॅन्सनी लावला होता. मात्र त्यावेळी तिने या गोष्टी अफवा असल्याचे सांगत सगळ्याचे खंडन केले होते. 

सध्या रणवीर आणि दीपिका लंडनमध्ये आहेत. दोघे तिथे '83' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटात दीपिका पादुकोण कपिल देव यांची पत्नी रोमी देव यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात काम करण्याविषयी तिने सांगितले होते की, '83' मध्ये कपिल देव यांची भूमिका रणवीर सिंगशिवाय दुसरा कुणी अभिनेता साकारत असता तरी देखील मी या चित्रपटात काम केले असते.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

*drum roll* All smiles as All-star @deepikapadukone joins the #83squad !!! @83thefilm @kabirkhankk

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deepika padukone called ranveer singh dady during insta live