Video: रणवीरची मिशी दीपिकाने हातात धरली अन्...

वृत्तसंस्था
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

अभिनेता रणवीर सिंगची मिशी अभिनेत्री दीपिका पदूकोण हिने हातामध्ये धरली आणि कापून टाकली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अभिनेता रणवीर सिंगची मिशी अभिनेत्री दीपिका पदूकोण हिने हातामध्ये धरली आणि कापून टाकली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काही तासांमध्येच लाखो नेटिझन्सी हा व्हिडिओ पाहिला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दीपिका कात्रीने रणवीरची मिशी कापण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी दोघांच्या चेहऱयावर आनंद आहे. मात्र, दीपिकाने रणवीरची मिशी कापल्यानंतर रणीवरने डोक्यालाच हात लावला. ‘फिल्मी ज्ञान’ या बॉलिवूड पेजने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

These two are pure cuteness and that’s how a couple should be like ?? Don’t you agree?

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan) on

बॉलिवूडचे बाजीराव मस्तानी अर्थात रणवीर-दीपिका यांनी लग्नाचा पहिला वाढदिवस नुकसाच साजरा केला. शिवाय, सुवर्ण मंदिर आणि तिरुपती मंदिरात दर्शन घेतले. दोघांनी 6 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर गेल्या वर्षी 14 नोव्हेंबरला इटलीच्या लेक कोमो येथे विवाह केला. दीपिका-रणवीरची ऑनस्क्रीन पेक्षा ऑफस्क्रीन केमिस्ट्री सर्वात जास्त गाजली. रणवीरने दीपिकाला प्रथम एका कार्यक्रमादरम्यान पाहिले होते. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी 2013 मध्ये त्यांना 'रामलीला' या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र आणले. दोघांमध्ये यादरम्यान जवळीक वाढायला सुरुवात झाली. या चित्रपटात अनेक रोमॅंटिक सीन आहेत.

दीपिका आणि रणवीर एकत्र येण्यात दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. दोघांनी भन्साळीच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या 3 चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. दीपिका आणि रणवीर लवकरच ’83’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: deepika padukone cut off ranveer singh beard mustache video viral