Ranveer Deepika Video: कसा वाटला मग सिनेमा? दीपिका करतेय नवऱ्याच्या 'रॉकी और राणी की प्रेम कहानी'चं प्रमोशन

 Ranveer Deepika Video
Rocky Aur Rani Kii Prem Kahaani
Ranveer Deepika Video Rocky Aur Rani Kii Prem KahaaniEsakal

Rocky Aur Rani Kii Prem Kahaani: बॉलिवूडची सुपरहिट जोडी आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांचा बहूप्रतिक्षीत रॉकी और राणी की प्रेमकहानी रिलिज झाला. या चित्रपटातुन सात वर्षानंतर करण जोहरने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

 Ranveer Deepika Video
Rocky Aur Rani Kii Prem Kahaani
Rocky Aur Rani Ki Prem Kahani: मराठमोळ्या क्षिती जोगचं दिग्दर्शक करण जोहरने केलं कौतुक, म्हणाला..

या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. रणवीर सिंग आणि आलिया दोन्ही या चित्रपटाचं प्रमोशनमध्ये व्यस्त होते. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता रणवीरची पत्नी अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील या चित्रपटाचं प्रमोशन करतांना दिसली. तिने नुकताच रणवीरचा रॉकी और राणी की प्रेम कहानी हा चित्रपट पाहिला.

त्यावेळी दीपिका आणि रणवीरनं रॉकी और राणी की प्रेम कहानी चित्रपटातील लोकप्रिय गाणं 'झुमका गिरा रे' हे रिक्रिएट केले. दीपिका आणि रणवीरनं या गाण्यावर कारमध्ये बसून डान्स केला. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दीपिका डान्स करते अन् नंतर रणवीर तिला त्याच्या चित्रपटातील एक डायलॉग बोलायला शिकवतोय.

 Ranveer Deepika Video
Rocky Aur Rani Kii Prem Kahaani
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'मी सांगतो, दयाबेन पुन्हा येणारच'! निर्मात्यांचा खुलासा

तो तिला म्हणतो, 'हाय रॉकी रंधावा आहे, हॅलो बेबी, आय लव्ह यू फ्रॉम माय लास्ट लाईफ', त्यानंतर दीपिका रणवीरच्या स्टाईलमध्ये डायलॉग बोलण्याचा प्रयत्न करते पण तिला काही जमत नाही. त्यानंतर ती म्हणते की तुझ्यासारखं फक्त तुलाच जमतं. हा व्हिडिओ शेअर करताना रणवीरने कॅप्शनमध्ये लिहिले - "तिला हे आवडलं आहे.."

हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यावर दोघांच्या चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. या व्हिडिओवर रॉकीची राणी म्हणजेच आलियानं कमेंटमध्ये हार्ट आय इमोजी शेयर केला. तर बाकिच्या सहकलाकारांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

 Ranveer Deepika Video
Rocky Aur Rani Kii Prem Kahaani
Cardi B Video: कार्डीवर पाणी उडवलं, तिनं डायरेक्ट माईकच फेकून हाणला

रॉकी और रानी की प्रेम कहानीमध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंगची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे. या चित्रपटाद्वारे करण जोहरची जादू पुन्हा एकदा प्रेक्षकांवर झाली आहे. चित्रपटातील गाणी आणि अनेक प्रमुख कलाकार प्रेक्षकांना आवडत आहे. चित्रपटातील धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी या जेष्ठ कलाकारांनाही प्रेक्षकांनी पसंती दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com