Oscars 2023: ऑस्करमध्येही दीपिकाचीच हवा!ग्लॅमरस लूकने वेधलं हॉलीवूडकरांचं लक्ष..

बॉलीवुड अभिनेत्री दीपिका पदूकोण ऑस्कर सोहळ्यात सहभाही झाली आहे.
Deepika Padukone reveals Oscars 2023 red carpet glamorous look in beautiful off shoulder black gown
Deepika Padukone reveals Oscars 2023 red carpet glamorous look in beautiful off shoulder black gownsakal
Updated on

Oscar 2023: चित्रपट क्षेत्रातील जगभरात सर्वात मानाचा पुरस्कार समजला जाणारा ऑस्कर सोहळा आज लॉस एंजेलिमधील 'डॉल्बी' थिएटरमध्ये पार पडतो आहे. या सोहळ्याला आता सुरुवात झाली आहे.

अत्यंत दिमाखदार असा हा सोहळा आहे. यंदाचा हा 95 वा ऑस्कर सोहळा असून भारतीयांसाठी तो प्रचंड महत्वाचा आहे. कारण भारताच्या 'RRR' चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याला संगीत विभागातून नॉमिनेशन आहे.

विशेष म्हणजे यंदा ऑस्करमध्ये प्रेझेंटर म्हणून अभिनेत्री दीपिका पदूकोणची निवड करण्यात आली आहे. थोड्या वेळापूर्वीच दीपिकाने ऑस्करच्या रेड करपेड वर हजेरी लावली आणि सगळ्यांचे भान हरपले.

Deepika Padukone reveals Oscars 2023 red carpet glamorous look in beautiful off shoulder black gown
Oscars 2023: रेड कारपेट सजला.. तयारी झाली, कलाकार आले, आता उत्सुकता त्या सोनेरी बाहुलीची..

या सोहळ्यासाठी दीपिकाने खास लुक केला आहे. ऑफ शोल्डर ब्लॅक गाऊन आणि त्यावर अस्सल हीऱ्यांचे दागिने दिपकाने परिधान केले आहेत. तिचा हा लुक सगळ्यांनाच आकर्षित करणारा आहे.

दीपिकाची रेड कारपेटवर एंट्री होताच सर्वजन अवाक झाले. तिच्या सौंदर्याने आणि ग्लॅमरस लुकने ती हॉलीवुडला वेड लावणार यात शंका नाही.

Oscar 2023 सोहळ्यात ज्यांच्या हस्ते पुरस्कार दिला जातो अशा Presenters ची जबाबदारी दीपिका पदुकोण सांभाळणार आहे. इतकंच नव्हे तर दिग्गज कलाकारांच्या यादीत दीपिका पदुकोणचं नवा समाविष्ट झाल्याने भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. Oscar 2023 मध्ये Presenters च्या यादीत Dwayne Johnson, Michael B Jordan असे दिग्गज कलाकार सहभागी आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com