लग्नानंतर दीपिकाचा 'हा' बोल्ड फोटो होतोय व्हायरल
दीपिकाचा हा नवा लूक जीक्यू या फॅशन मॅगझिनमधील असून या मॅगझिनच्या नवीन अंकासाठी तिने हे फोटोशूट केले आहे. या प्रत्येक फोटोमध्ये दीपिकाचा खास आणि हटके अंदाज पाहायला मिळत आहे. हा फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरूनही शेअर केला आहे.
मुंबई- लग्नबंधनात अडकल्यानंतर 5 दिवसांनी दीपिका आणि रणवीरने त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या दोघांच्या लग्नाच्या फोटोंची जितक्या आतुरतेने फॅन्स वाट पाहत होते तितकीच उत्कंठा बॉलीवुडच्या कलाकारांनाही होती. दीपिकाच्या लग्नाचे फोटोंची जादू सोशल मीडियावर संपत नाही तोपर्यंत दीपिकाचा हॉट अंदाज समोर आला आहे.
दीपिकाचा हा नवा लूक जीक्यू या फॅशन मॅगझिनमधील असून या मॅगझिनच्या नवीन अंकासाठी तिने हे फोटोशूट केले आहे. या प्रत्येक फोटोमध्ये दीपिकाचा खास आणि हटके अंदाज पाहायला मिळत आहे. हा फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरूनही शेअर केला आहे.
लग्नानंतर दीपिकाचा हॉट अंदाजातले फोटो पाहून सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी तिला खूप सारे लाईक्स आणि कमेंटस दिल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोशूटमधला दीपिकाचा ब्युटी इन ब्लॅक अंदाज कुणालाही घायाळ करणारा असाच म्हणावा लागेल.