Deepika Padukone In FIFA: 'फिफा'च काय कान्स मध्येही दीपिकाने धुरळा उडवला होता.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

deepika padukone speech in cannes she said cannes films festival would be at india

Deepika Padukone In FIFA: 'फिफा'च काय कान्स मध्येही दीपिकाने धुरळा उडवला होता..

Deepika Padukone In FIFA: सगळ्यांचे लक्ष अनेक दिवसांपासून वेधून असलेला फिफा विश्वचषक 2022 फूटबॉल अंतिम सामाना काल कतारच्या लुआस स्टेडियमवर अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात रंगला. या सामन्यात अर्जेंटिनाने बाजी मारली. यावेळी अभिनेत्रीने दीपिका पदुकोणने फिफा विश्वचषक 2022 ची ट्रॉफी लाँच करून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. यावेळी दीपिकाचा लुक, तिची फॅशन तिचे कर्तृत्व या साऱ्याचीच बक्कळ चर्चा झाली. पण दीपिकाला मिळालेला हा काही पहिलाच बहुमान नव्हता. याआधीही जगातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये दीपिकाने आपली जादू दाखवली होती. त्याचीच ही गोष्ट.. (deepika padukone speech in cannes she said cannes films festival would be at india)

हेही वाचा: Deepika Padukone In FIFA: फिफामध्ये दीपिका.. ट्रोलर्सला थप्पड की शाहरूखची सेटिंग..

यंदाच्या 'कान्स' मध्ये भारतातून मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांचा मोठा ताफा गेला होता. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांच्यासह तापसी पन्नु, नवाझुद्दीन सिद्धिकी, दीपिका पदुकोण, नयनतारा, आर माधवन यांच्या नावाचा समावेश आहे. पण त्यात विशेष ठरली. कारण दीपिका यंदाच्या कान्समध्ये परिक्षकाच्या भूमिकेत होती. कान्समध्ये तिच्या लुकची, कपड्यांची साऱ्याचीच चर्चा झाली. पण दीपिका हिट ठरली ते तिच्या भाषणामुळे.. तिच्या भाषणामुळे सारेच अवाक झाले.

हेही वाचा: ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

यावेळी दीपिका म्हणाली होती, 'कान्ससारख्या जागतिक चित्रपट महोत्सवामध्ये भारताला मिळालेला गौरवाचं स्थान समस्त भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. कान्सला देखील 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याला 75 वर्षे पूर्ण झाली असल्यानं यानिमित्तानं जो गौरव भारताच्या वाट्याला आला आहे त्याचे समाधान मोठे आहे. भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर आहे. आता ती आपल्यासमोर येते आहे. त्याला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसादही मोठा आहे. जागतिक पातळीवरुन त्या कलेला मिळणारा प्रतिसाद यामुळे कलाकाराचं होणारं कौतुक यामुळे चित्रपट माध्यमाची व्याप्ती आणखी वाढण्यास मदत होते. यापुढील काळात भारत हा कान्समध्ये नसेल तर भारतात कान्स होईल.'

दीपिकाच्या या विधानाने साऱ्यांचेच लक्ष वेधले होते. दीपिकाचे हे विधान अत्यंत धाडसचे होते. त्यामुळे दीपिकाचे सर्वत्र कौतुकही झाले. आता 'फिफा' मुळे पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे.