Deepika Padukone : अभिनेत्री दीपिका पदुकोण अजुनही ब्रीच कँडी रुग्णालयात? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deepika Padukone was admitted to Breach Candy Hospital last night viral bhayani post viral

Deepika Padukone : अभिनेत्री दीपिका पदुकोण अजुनही ब्रीच कँडी रुग्णालयात?

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री दीपिकाच्या बाबत एक मोठी घडामोड समोर आली आहे. ती म्हणजे दीपिकाला ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्या वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. गेल्या काही दिवसांपासून दीपिका टेस्टसाठी रुग्णालयात जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

आता सोशल मीडियावर विरल भयानीनं इंस्टावर एक पोस्ट व्हायरल केली आहे. त्यामध्ये त्यानं काल दीपिकाला ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे म्हटले आहे. तिनं वेगवेगळ्या टेस्ट केल्याचे म्हटले आहे. आता तिची प्रकृती व्यवस्थित असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र दीपिकाच्या वतीनं अधिकृतपणे कोणतीही माहिती पुढे आलेली नाही.

हेही वाचा: Madhuri Dixit: माधुरीला नाही म्हणायचं नसतं!

हेही वाचा: Raveena Tondon: रविनानं पुन्हा धरलं बाळसं! कसली दिसतीये...

दीपिका पदुकोण आता शाहरुख खानसोबत पठाणमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात जॉन अब्राहमचीही प्रमुख भूमिका आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट २५ जानेवारी रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. तो हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्ये प्रदर्शित होणार आहे. पठाण व्यतिरिक्त दीपिका पदुकोणची फायटर आहे, ऋतिक रोशनच्या विरुद्ध. प्रभास आणि अमिताभ बच्चन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या प्रोजेक्ट K चा ती देखील भाग आहे.

हेही वाचा: Nikki Tamboli: 'ही' निक्की तांबोळी आहे तरी कोण?