'राधे' ची पायरसी करणाऱ्यांचे Whats App बंद करा; उच्च न्यायालय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

salman khan

'राधे' ची पायरसी करणाऱ्यांचे Whats App बंद करा; उच्च न्यायालय

बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानचा (salman khan) 'राधे युवर मोस्ट वाँटेड भाई'(Radhe: Your Most Wanted Bhai) हा चित्रपट सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुमाकुळ घालत आहे. या चित्रपटाच्या प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. सलमानच्या या चित्रपटाची सोशल मीडियावर काहींनी पायरसी करण्यास सुरुवात केली आहे. पायरसी विरोधात याआधी तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पण अजूनही काही पण या चित्रपटाची पायरसी करत आहेत. यासंदर्भात आता उच्च न्यायालयानाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे. (Delhi HC Directs WhatsApp To Suspend Services Of Users Pirating 'Radhe')

दिल्ली हायकोर्टाच्या आदेशात नमूद केले आहे की, 'हा चित्रपट १३ मे 2021 झी-५ डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. प्रेक्षक हा चित्रपट पैसे देऊन पाहत होते पण काही जण पायरसी करून हा चित्रपट फुकट पाहत होते.काही प्रेक्षक हा चित्रपट व्हाट्स अँप वर एकमेकांना शेअर करत होते त्यामुळे चित्रपटाचे नुकसान होत होते. जे लोक चित्रपट व्हाट्स अँप वरून शेअर करत आहेत किंवा त्यांनी केला आहे अशांचे व्हाट्स अँप अकाउंट असलेला नंबर त्वरित बंद करण्यात यावा'

सलमानने हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये सलमानने 'राधे' चित्रपटाचे प्रमोशन करत चित्रपट पायरसीचा विषय नेटकऱ्यांसमोर मांडला. या व्हिडीओमध्ये सलमान म्हणाला, 'एक चित्रपट बनवण्यासाठी अनेक लोक कष्ट घेतात. मी सर्वांनी विनंती करतो की चित्रपटाचा आनंद घ्या पण तो योग्य प्लॅटफॉर्मवर पाहूनच घ्या.'