अभिनेता देवदत्त नागेचं 'ग्रीन वर्कआऊट' पाहिलंत का?

दिपाली राणे-म्हात्रे
Tuesday, 21 July 2020

देवदत्त नागे हा किती फिटनेस फ्रिक आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे डॉक्टर डॉनच चित्रीकरण चालू असताना सेटवर जेव्हा शॉट नसतो, तेव्हा तो सेटवरच्या गार्डनमध्ये वर्कआऊट करताना पाहायला मिळतो.

मुंबई- देवदत्त नागे, श्वेता शिंदे आणि रोहिणी हट्टंगडी अशा दिग्गज कलाकारांचे, 'झी युवा' वाहिनीवरील 'डॉक्टर डॉन' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन झाले. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. डॉक्टर डॉनने निराळा धुमाकूळ घालत, आपले सगळ्यांचे भरभरून मनोरंजन करण्यास सुरुवात केली. मालिकेचा वेगळा विषय, डॉक्टर डॉन आणि त्याच्या पंटर मंडळींचा जलवा यासगळ्या गोष्टी प्रेक्षकांच्या लाडक्या ठरल्या. कोरोनानंतर आता पुन्हा एकदा हि मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. प्रत्येक जण योग्य ती खबरदारी घेऊन पुन्हा एकदा नव्या जोमाने शूटिंगच्या कामात व्यस्त झाला आहे.

हे ही वाचा: सलमान राबतोय शेतात, युलियासोबत भातलावणीचा व्हिडिओ केला शेअर..

‘डॉक्टर डॉन’च चित्रीकरण मीरा रोडमध्ये न होता कर्जतच्या एका रिसॉर्ट मध्ये होतंय. देवदत्त नागे हा किती फिटनेस फ्रिक आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे 'डॉक्टर डॉन'च चित्रीकरण चालू असताना सेटवर जेव्हा शॉट नसतो, तेव्हा तो सेटवरच्या गार्डनमध्ये वर्कआऊट करताना पाहायला मिळतो. कर्जतसारख्या निसर्गरम्य ठिकाणी वर्कआऊट करण्याची मजा काही औरच असल्याचं देवदत्तच म्हणणं आहे. त्याने या वर्कआउटला 'ग्रीन वर्कआउट' असं म्हटलंय. सेटवरच बायसेप्सच वर्कआउट निर्सर्गाच्या सानिध्यात करण्याचा आनंद देवदत्त नागे याने सोशल मीडियावर देखील व्यक्त केला आहे.

देवदत्तने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पोस्ट करताना देवदत्त लिहितो, 'डॉक्टर डॉनच्या हेक्टिक शूटनंतर निसर्गाच्या सान्निध्यात वर्कआऊट करण्याचा आनंद तोही झाडांसोबत, ग्रीन वर्कआऊट. खरंच स्वर्ग.' ही पोस्ट शेअर करताना त्याने लोकेशनही टॅग केलंय त्यामुळे आता 'डॉक्टर डॉन'चं शूट कुठे होतंय याचीही प्रेक्षकांना कल्पना आली आहे. सह्याद्री माऊंटन रेंज असं लोकेशन देवदत्तने टॅग केलं आहे.

काही दिवसांपूर्वी 'डॉक्टर डॉन' मालिकेचा मीरा रोड येथे असणारा सेट कोविड-१९ च्या रुग्णांसाठी देण्यात आला होता. हा सेट हॉस्पिटलसारखा उभारण्यात आल्याने त्यांच्याकडे या सेटची मागणी करण्यात आली होती. त्यांनतर या मालिकेचं मुंबईबाहेर शूटींग सुरु असल्याचं कळत होतं.  

devdatta nage doing workout with trees on set called green workout  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: devdatta nage doing workout with trees on set called green workout