'साखरपुडयाची बातमी खोटी,तो एक प्रॅंक होता,..';देवोलिनानं केलं स्पष्ट

एका म्युझिक व्हिडीओसाठी ते फोटोशूट केलं गेल्याचं बोललं जात आहे.
Devoleena Bhattacharjee, Vishal Singh
Devoleena Bhattacharjee, Vishal SinghGoogle

आपल्या सर्जरीनंतर घरी परतलेली बिग बॉस फेम देवोलिना भट्टाचार्जी( Devoleena Bhattacharjee) गेल्या काही दिवसात भलतीच चर्चेत होती. तिचे काही असे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले की त्यामुळे ती चर्चेचा विषयच बनून गेली. खरंतर तिच्या त्या फोटोंमुळे तिचे चाहते मात्र तिच्यावर भलतेच खूश झालेले दिसून आले. पण त्यानंतर मात्र आता तेच चाहते देवोलिनावर का बरं नाराज झालेयत? 'साथ निभाना साथिया' मधून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री देवोलिनानं छोट्या पडद्यावरचा अभिनेता विशाल सिंहसोबत आपले काही फोटो शेअर केले होते. या फोटोत या दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारलेली दिसून आली होती. तेव्हाच देवोलिनाच्या बोटात एक मोठी हिऱ्याची अंगठीही दिसून आली होती.

Devoleena Bhattacharjee,Vishal Singh
Devoleena Bhattacharjee,Vishal Singh Google

विशाल आणि देवोलिना दोघांनीही हा फोटो शेअर केला होता. एका फोटोत तर चक्क विशाल देवोलिनाला हिऱ्याची अंगठी आणि पुष्पगुच्छा सोबत प्रपोज करताना दिसत आहे. तर एका फोटोत देवोलिना विशालला अलिंगन देत हातातली अंगठी दाखवताना दिसत आहे. या फोटोंना शेअर करताना तिनं कॅप्शन दिलं होतं की,''इट्स ऑफिशियल''. तसंच तिनं हॉट आणि अंगठीचा इमोजीही पोस्ट केला होता. आता या फोटोंना पाहून कुणीही समजेल की यांचा साखरपुडा झालेला आहे. ते फोटो पोस्ट झाले आणि त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. पण आता फोटो अशाप्रकारे व्हायरल झाल्यानंतर बातमी येत आहे की त्यांच्या साखरपुड्याची बातमीच खोटी आहे. स्वतः देवोलिनानं याविषयी स्पष्टिकरण दिलं आहे.

Devoleena Bhattacharjee, Vishal Singh
बहिणीसोबत फोटोशूट करताना सैफच्या चेहऱ्यावरचं हसू का हरवलं?

त्या दोघांनी फोटोमधून सगळं खोटं भासविल्यामुळे आता त्यांना ट्रोल केलं जात आहे. त्यांचे चाहते त्यांच्यावर नाराज झालेले दिसून आले आहेत. देवोलिनानं देखील या अफवेच्या बातमीवर स्पष्टिकरण देताना म्हटलं आहे की,''हे फोटो एका म्युझिक व्हिडीओच्या प्रमोशनसाठी क्लिक केले होते. ही फक्त एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी होती. आमच्यात असं कोणतंही नातं नाही. विशाल माझा खूप चांगला मित्र आहे यापेक्षा जास्त आमच्यात कोणतंही नातं नाही''. तसंच पुढे ट्रोलिंगला घेऊन ती म्हणाली की,''आम्ही सोशल मीडियावर कोणतीही खोटी बातमी पसरवली नाही हा फक्त एक प्रॅंक होता,यातनं कोणालाही नुकसान झालं नाही''. विशाल आणि देवोलिनानं एकत्र छोट्या पडद्यावर काम केलं आहे. विशालने 'साथ निभाना साथिया' मालिकेत देवोलिनाच्या दीराचं काम केलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com