
Mohit Raina: 'देवों के देव महादेव' अभिनेता मोहित रैनाच्या घरी हलला पाळणा...चाहत्यांना दाखवली मुलीची झलक
Mohit Raina: मोहित रैना हा छोट्या पडद्यावरचा एक प्रसिद्ध चेहरा आहे,जो 'देवों के देव महादेव' या मालिकेत महादेव ही मुख्य व्यक्तीरेखा साकारल्यानंतर घराघरात ओळखला जाऊ लागला. गेल्या जानेवारी महिन्यात मोहितनं अदिती शर्मासोबतल लग्न झाल्याची घोषणा करत आपल्या इन्स्टाग्राम हॅंडलवर काही फोटो शेअर केले होते.
अर्थात त्याच्या लग्नाची बातमी व्हायरल झाल्यानंतर घटस्फोटाची देखील अफवा उडाली होती. पण गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अभिनेत्यानं त्या सगळ्या अफवा असल्याचं सांगितलं होतं आणि आता या दाम्पत्यानं आपल्या आयुष्यात एका लहान क्युट परीचं स्वागत केलं आहे. (devon ke dev mahadev actor mohit raina became father after a year of marriage)
मोहिती आणि त्याची पत्नी आदिती आपल्या काही फ्रेन्डसच्या माध्यमातून एकमेकांना भेटले आणि प्रेमात पडले. पण ही गोष्ट त्यांनी जोपर्यंत ते लग्नगाठ बांधत नाहीत तोपर्यंत लपवून ठेवली होती. इतकंच काय तर आपल्या लग्नानंतर मोहितनं पत्नीच्या प्रेग्नेंसीची बातमीदेखील लीक होऊ दिली नाही. आणि आता तो एका मुलीचा पिता बनला आहे.
नुकताच मोहित रैनानं आपल्या इन्स्टाग्राम हॅंडलवर एक क्यूट व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये मोहित आणि आदितीच्या हातात एक चिमुकला हात दिसत आहे.
मोहितनं ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर करताना व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे की,''आणि आम्ही दोघांचे तिघे झालो. माझ्या लहान परीचं या जगात स्वागत आहे''.
हेही वाचा: ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?
काही दिवस आधी बातमी होती की मोहित रैना आणि अदिती शर्मा घटस्फोट घेत आहेत. पण अभिनेत्यानं त्या सगळ्या अफवा आहेत असं सांगितलं होतं.
आणि इंडियन एक्सप्रेसशी बातचीत करताना एका मुलाखतीत म्हटलं होतं की-''मला खरंच माहित नाही की ही बातमी कशी पसरली..एका ऑनलाइन पोर्टलनं ही बातमी दिली होती''.
मोहित आणि आदिती यांच्या लग्नाला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं आहे.