Dhanush: धनुषच्या मुलावर पोलिसांनी केली कारवाई, काय आहे कारण?

साऊथ अभिनेता धनुषच्या मुलावर पोलिसांनी मोठी कारवाई केलीय
Dhanush's son Yatra caught riding superbike without helmet and license, police impose Rs 1000 fine: Report
Dhanush's son Yatra caught riding superbike without helmet and license, police impose Rs 1000 fine: Report Esakal

Dhanush Son News: साऊथ अभिनेता धनुषच्या मुलावर पोलिसांनी मोठी कारवाई केलीय. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी धनुषचा मुलगा यात्रावर पोलिसांनी कारवाई केलीय. काय आहे प्रकरण जाणून घ्या.

Dhanush's son Yatra caught riding superbike without helmet and license, police impose Rs 1000 fine: Report
Sangeet Devbabhali: कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर 'संगीत देवबाभळी घेणार निरोप', सहा वर्षांच्या प्रयोगांच्या वारीला पूर्णविराम

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांनी धनुषचा मुलगा यात्राला दंड ठोठावला असल्याची माहिती समोर आली आहे.

चेन्नईच्या पोस गार्डन परिसरात यात्राला सुपरबाईक चालवत असलेला एक व्हिडिओ ऑनलाइन समोर आला आहे. त्याच्यासोबत एक गाईड असुन तो त्याला बाईक चालवण्यासाठी मार्गदर्शन करतोय.

धनुषच्या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये यात्राने हेल्मेट घातले नव्हते आणि त्याच्या दुचाकीची नंबर प्लेट दिसत नव्हती. याशिवाय, यात्राकडे ड्रायव्हिंग लायसन्सही नव्हतं. ज्यामुळे यात्राकडून नियम मोडले गेले. आणि चेन्नई वाहतूक पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केलीय.

Dhanush's son Yatra caught riding superbike without helmet and license, police impose Rs 1000 fine: Report
Mohammed Shami: मोहम्मद शमीकडून सोनू सूदचा मुलगा घेतोय क्रिकेटचे धडे, व्हिडीओ व्हायरल

पोलिसांनी यात्राची आई ऐश्वर्या रजनीकांत यांच्या मार्फत त्याची ओळख पटवली. कारण यात्राने तोंडावर रुमाल बांधला होता. तपासाअंती पोलिसांनी यात्राला वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 1000 रुपयांचा दंड ठोठावला.

एक वर्षापूर्वी धनुष आणि पत्नी ऐश्वर्या रजनीकांत यांनी घटस्फोट घेतला होता. यात्राला वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आणि त्याला दंड ठोठवण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com