Deaths In Gym:'जीममध्ये वर्कआऊट केल्यानं मृत्यू होत नाहीत, तर...', सुनील शेट्टी स्पष्टच बोलला

वयाच्या ५६-५७ व्या वर्षी देखील सुनिल शेट्टीचा फीटनेस अनेकांना प्रेरणा देणारा आहे.
Dharavi Bank actor suniel shetty on why growing death in gyms
Dharavi Bank actor suniel shetty on why growing death in gymsGoogle
Updated on

Deaths In Gym: गेल्या काही दिवसांत वर्कआऊट करताना हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण झपाट्याने वाढते आहे. कितीतरी असे सेलिब्रिटी आहेत ज्यांचा मृत्यू गेल्या काही दिवसांत जीममध्ये वर्कआऊट करताना झाला आहे. काही दिवसांपूर्वीच कॉमेडी आर्टिस्ट राजू श्रीवास्तव यांचा आणि नुकताच सिद्धांत सूर्यवंशी याचा देखील मृत्यू हा जीममध्ये वर्कआऊट करताना झाला. गेल्यावर्षी साऊथ स्टार पुनीत राजकुमार याचं निधनही जीममध्ये वर्कआऊट करताना झालं. आता यामुळे प्रश्न निर्माण झालाय की जीममध्ये वर्कआऊट करताना हार्टअटॅकचं प्रमाण का वाढतंय? धारावी बॅंक च्या निमित्तानं दिलेल्या एका मुलाखतीत सुनिल शेट्टीनं या गंभीर विषयावर महत्त्वपूर्ण संवाद साधला आहे.(Dharavi Bank actor suniel shetty on why growing death in gyms)

Dharavi Bank actor suniel shetty on why growing death in gyms
Arjun Kapoor On Sex: 'लग्नाआधी इंटिमेट होणं किती योग्य?',अर्जुन कपूरनं दिलं कडक उत्तर

सुनिल शेट्टीचं नाव त्या बॉलीवूड कलाकारांमध्ये घेतलं जातं जे आपली बॉडी आणि फिटनेससाठी इंडस्ट्रीमध्ये ओळखले जातात. तो आजही पूर्वीसारखाच फीट आणि हॅंडसम आहे. सध्या तो चर्चेत आहे ते मॅक्स प्लेयरवर रिलीज होणाऱ्या त्याच्या 'धारावी बॅंक' या वेब सीरिजच्या निमित्तानं. या वेबसीरिजच्या निमित्तानं बोलताना सुनिल शेट्टीला जीममध्ये वर्कआऊट करताना वाढणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणाविषयी विचारलं गेलं.

हेही वाचा: का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

यावर सुनिल शेट्टी म्हणाला, ''हा सगळा प्रॉब्लेम सप्लिमेंटमुळे होत आहे. जे स्टीरॉइड्स घेतात,सप्लिमेंट घेतात त्यांच्याबाबतीत हार्टअटॅकचं प्रमाण वाढतंय. वर्कआऊट ही समस्या नाही. असं नाही की ते एका मर्यादे पलिकडे आपल्या शरीराला स्ट्रेच करत आहेत. हे हार्ट फेल्युअर आहे,हार्ट अटॅक नाही. आणि ही समस्या सप्लिमेंट आणि स्टीरॉइड्समुळे भेडसावत आहे''.

याच बाबतीत सैफ अली खाननं काही वेगळी कारणं सांगितली होती, वेळेवर खाणं-पिणं नाही,कमी झोप या कारणांनी वर्कआऊट करताना जीममध्ये हार्ट फेल होण्याचे प्रमाण वाढल्याचं तो म्हणाला होता. त्याचवेळी त्यानं नमूद केलं होतं की,''योग्य खाणं-पिणं म्हणजे कडक डायटिंग नाही. योग्य खाणं पिणं म्हणजे न्यूट्रिशन्स असा माझा सांगायचा अर्थ आहे. योग्य प्रमाणात न्युट्रिशन घेणं गरजेचं आहे''.

या गंभीर समस्येविषयी बोलताना सुनिल शेट्टीनं आणखी एक महत्त्वाची गोष्ट नमूद केली होती की, ''कोव्हिड नंतर आता प्रत्येकानं आपल्या शरीराची तपासणी करून घ्यावी. कारण कोव्हिडमुळे ब्लड क्लॉटिंगची समस्या वाढताना दिसत आहे. आणि हे खूप वाईट परिणाम करणारं ठरू शकतं''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com