esakal | “करण भाऊ,आपण केलेला कचरा बरोबर घेऊन जा”; धर्मा प्रॉडक्शन्सला नोटीस
sakal

बोलून बातमी शोधा

 Dharma Productions Showcaused For Littering in Goa Village

गोव्याच्या कचरा व्यवस्थापन कार्यालयाकडून  निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या ‘धर्मा प्रॉडक्शन्स’ कंपनीला नोटीस बजावण्यात येणार आहे.शूटिंगनंतर केलेला कचरा धर्मा प्रॉडक्शन्सकडून साफ करण्यात आला नव्हता.

“करण भाऊ,आपण केलेला कचरा बरोबर घेऊन जा”; धर्मा प्रॉडक्शन्सला नोटीस

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बॉलीवूडचा प्रसिध्द निर्माता व दिग्दर्शक करण जोहर हा आता त्याने केलेल्या एका गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. तो चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी गोव्यात गेला होता. मात्र तिथे त्याचा बेशिस्तपणा उघकीस आल्याने गोव्याच्या प्रशासनाने त्याची कानउघाडणी केली आहे. गोव्याचे कचरा प्रशासनाने करणला त्याने चित्रिकरणावेळी केलेला कचरा बरोबर घेऊन जावा. या शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

गोव्याच्या कचरा व्यवस्थापन कार्यालयाकडून  निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या ‘धर्मा प्रॉडक्शन्स’ कंपनीला नोटीस बजावण्यात येणार आहे. ‘गोव्यात प्रत्येकाचं स्वागत आहे. इथे शूट करा पण त्यासोबत केलेला कचरा इथून घेऊन जा’, अशा शब्दांत गोव्याचे कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी करण जोहरवर नाराजी व्यक्त केली आहे. गोव्यातील एका गावात करण जोहरच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. शूटिंगनंतर त्याठिकाणी प्लास्टिकचे चमचे, प्लेट्स, इतर कचरा तसेच फेकून देण्यात आले.

शूटिंगनंतर केलेला कचरा धर्मा प्रॉडक्शन्सकडून साफ करण्यात आला नव्हता. त्यानंतर त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.अनेकदा ज्या शहरांमध्ये चित्रिकरणासाठी गेलेल्या शहरांमध्ये कुठल्याही प्रकारची अस्वच्छता होऊ नये याकरिता आवश्यक त्या मार्गदर्शक सुचनाही पालिका प्रशासनाकडून देण्यात येतात. त्यावर योग्य ती काळजी घेण्याचे हमीपत्रही संबंधित व्यक्तीकडून भरुन घेण्यात येते. अभिनेत्री कंगना रणौतने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत धर्मा प्रॉडक्शन्सवर टीका केली होती.

 करण जोहरच्या टीमने गोव्यात शूटिंगच्या ठिकाणी कचरा टाकल्याचं तिने निदर्शनास आणून दिलं होतं. त्यानंतर मायकल लोबो यांनी या प्रकरणात लक्ष घालत कारवाईचे आदेश दिले आहेत. “गोवा हे अत्यंत सुंदर राज्य आहे आणि इथे अनेकजण शूटिंगसाठी येतात. प्रत्येकाचं इथे स्वागतच आहे, पण इथे कचरा करू नका. केला तरी तो जाताना सोबत घेऊन जा. धर्मा प्रॉडक्शन्सने या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त करावी,” असं त्यांनी सांगितले आहे. 


 

loading image