मी अजूनही गावकडचाच मुलगा; सुपरस्टार धर्मेंद्रजींना बॉलीवूडमध्ये 60 वर्षे पूर्ण 

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 11 October 2020

धर्मेंद्र यांना सोशल मीडियावर फॉलो करणा-यांची संख्या मोठी आहे. दिवसेंदिवस तो आकडा वाढत आहे. इंस्टाग्रामवर धर्मेंद्र यांचे नाव 'आप का धरम' या नावाने आहे. धर्मेद्र यांनी जो व्हिडिओ शेयर केला आहे त्यात त्यांनी आपल्या गावाकडच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

मुंबई -बॉलीवूडचे हि मॅन अशी ओळख असणा-या सुपरस्टार धर्मेंद्र पाजी यांना नुकतीच बॉलीवूडमध्ये 60 वर्षे पूर्ण झाली आहेत. सध्या सोशल मीडियावर धर्मेंद्र अॅक्टिव्ह आहेत. त्यांनी आपल्या चाहत्यांसाठी एक व्हिडिओ शेयर केला आहे. गेल्य़ा काही वर्षांपासून भलेही धर्मेंद्र हे बॉलीवूडपासून लांब राहिले असतील मात्र यामुळे त्यांच्य़ा चाहत्यांच्या संख्येत काही कमी झालेली नाही.

धर्मेंद्र यांना सोशल मीडियावर फॉलो करणा-यांची संख्या मोठी आहे. दिवसेंदिवस तो आकडा वाढत आहे. इंस्टाग्रामवर धर्मेंद्र यांचे नाव 'आप का धरम' या नावाने आहे. धर्मेद्र यांनी जो व्हिडिओ शेयर केला आहे त्यात त्यांनी आपल्या गावाकडच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आपल्या मनात अजूनही गावाकड्च्या अनेक आठवणी रुंजी घालतात. असे ते सांगतात. त्यांनी लिहिले आहे की, मित्रांनो मला आता फिल्म इंडस्ट्रीत 60 वर्षे पूर्ण झाली आहेत. माझा प्रवास हा इतका असेल असा कधीही मी विचार केला नाही. तसेच मी कुणी एखादा सेलिब्रेटी आहे असेही माझ्या डोक्यात आले नाही. मी अजूनही माझ्या गावचा एक नम्र मुलगा आहे. ज्याची मोठी स्वप्ने होती आणि आहेत.

चाहत्यांनो माझी तुम्हाला एक विनम्र विनंती आहे की, तुम्ही सर्वजण दयाळु आणि विनम्र व्हा. आपल्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांचा आदर करा. त्यांना सन्मान द्या. या गोष्टी तुम्ही प्रामाणिकपणे केल्यास तुम्हाला तुमच्या ध्य़ेयापर्यत पोहचण्यास कुणीही रोखू शकणार नाही. असा सल्ला धर्मेंद्रने तरुणांना दिला आहे. 60 वर्षांच्या आपल्या करियरमध्ये धर्मेंद्र यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

60 च्या दशकात त्यांनी बंदिनी, सत्यकाम, फूल और पत्थर, हकीकत सारखे हिट चित्रपट दिले. त्यानंतर 70 च्या दशकात शोले, चरस, ड्रीम गर्ल, सीता और गीता, धरमवीर, प्रोफेसर प्यारेलाल, चुपके चुपके, मेरा गांव मेरा देश, प्रतिज्ञा, जीवन मृत्यु, ब्लैकमेल, शालीमार सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट प्रदर्शित झाले. 2018 मध्ये त्यांचा यमला पगला दीवाना फिर से हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.  

 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dharmendra completes 60 years in bollywood and shares a video