सावत्र मुलीशी दिया मिर्झाचं आहे खास बॉन्डिंग! भावूक पोस्टनं वेधलं लक्ष Dia Mirza | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dia Mirza, Samaira Rekhi

सावत्र मुलीशी दिया मिर्झाचं आहे खास बॉन्डिंग! भावूक पोस्टनं वेधलं लक्ष

अभिनेत्री दिया मिर्झानं(Dia Mirza) इन्स्टाग्रामवर तिच्या सावत्र मुलीसाठी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. दियानं ही पोस्ट तिची सावत्र मुलगी(Step Daughter) समायराच्या वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा देताना केली आहे. तिनं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे,''तु मनापासून तुमच्या कुटुंबात माझं स्वागत केल्याबद्दल धन्यवाद''. दिया मिर्झानं समायराचे वडिल वैभव रेखीशी २०२१ मध्ये काही मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न केलं. त्यानंतर एका वर्षाच्या आत वैभव आणि दियानं आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं. त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव 'अव्यान' असं ठेवलं आहे.

दिया मिर्झा नेहमीच तिची सावत्र मुलगी समायरासोबतचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. दियानं पोस्टमध्ये लिहिलंय,''समायरा १३ व्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा. तु मनापासून माझा स्विकार केलास,तुमच्या कुटुंबात स्वागत केलंस याबद्दल धन्यवाद. तु माझ्यासाठी खूप खास आहेस. तुझ्यासोबत मला आयुष्य घालवायचं आहे,तुझ्याकडून शिकायचं आहे अन् तुझ्यासोबत पुढे जायचं आहे. आय लव्ह यू. नेहमीच अशी आनंदी रहा,आणि तुझ्या हास्यानं आमचं आयुष्यही आनंदानं उजळू दे''.

हेही वाचा: पायल-संग्रामच्या नात्याचा Black Magic मुळे होणार होता The End?

दियानं इंडियन एक्सप्रेसला मुलाखत देताना म्हटलं की, ''समायरा मला माझ्या मुलीसारखीच आहे जसा माझा मुलगा अव्यान आहे. ती आता वयाच्या अशा टप्प्यावर आहे जेव्हा आम्ही एकत्र नाचू शकतो,सीक्रेट्स शेअर करु शकतो,खूप अॅक्टिव्हिटीज एकत्र एन्जॉय करू शकतो.मला आनंद आहे आणि तिचा अभिमानही वाटतो की समायरानं अत्यंत मनापासून माझा स्विकार केला आहे. आई होणं,तो प्रवास अनुभवणं यापेक्षा दुसरा आनंद नाही आणि मी माझ्या दोन्ही मुलांच्या माध्यमातून त्याचा दुपटीनं आनंद घेत आहे''.

हेही वाचा: अभिनेत्याची टी.व्ही शो मध्ये कबुली; पत्नीला गर्भपातासाठी केलं होतं मजबूर

दिया मिर्झाचं वैभव रेखीशी हे दुसरं लग्न आहे तसंच वैभवनंही आपली पहिली पत्नी सुनैना हिच्यापासून विभक्त झाल्यानंतर दियाशी दुसरं लग्न केलं आहे.समायरा ही सुनैना आणि वैभवची मुलगी. सुनैनानं देखील वैभवच्या दुसऱ्या लग्नाचा मनापासून स्विकारत केला आहे. दिया-वैभवच्या लग्नानंतर सुनैनानं केलेली पोस्ट व्हायरल झाली होती.. तिनं त्यात म्हटलं होतं,''मी आणि समायरा ठीक आहोत. आनंदी आहोत. आमचं मुंबईत कोणी नातेवाईक नाही पण आता माझी मुलगी समायराला दियाच्या रुपात एक फॅमिली मेंबर मिळणार आहे. लग्नातील समायराचे व्हिडीओ मी पाहिले. तिनं आपल्या वडिलांचं दुसरं लग्न आनंदान स्विकारलं आहे आणि मी देखील. आमच्यासाठी काळजी करणाऱ्यांची मी आभारी आहे''. अशी ती पोस्ट होती.

Web Title: Dia Mirza Shares Emotional Post On Step Daughter Samairas Birthday Thank You For Opening Your Heart And Home To

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..