दिशाने केली नाकाची सर्जरी?; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

दिशाचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय.
Disha Patani
Disha PataniInstagram

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी Disha Patani ही तिच्या फॅशनमुळे, लव्ह-लाईफमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर सक्रिय असणारी दिशा सतत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात असते. दिशा नुकतीच 'अंतिम : द फायनल ट्रुथ’ या चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी पोहोचली होती. तिथला तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून या व्हिडीओमुळे ती ट्रोल होत आहे.

दिशाचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये दिशाने पिवळ्या रंगाचा टॉप आणि जीन्स परिधान केली आहे. दिशा यात थोडी वेगळी दिसत असल्याने, तिने नाकाची सर्जरी केली असल्याचं म्हटलं जात आहे. या व्हिडीओवरून तिला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. दिशाचा हा व्हि़डीओ पाहिल्यानंतर एकाने म्हटलं, ‘आणखी एक अभिनेत्री, हिनेदेखील तिचा चेहरा खराब करून घेतला.’ तर दुसऱ्याने लिहिलं, ‘तिने तिच्या नाकाला काही तरी केलं आहे.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘ही वेगळीच दिसते.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘ती आधी सुंदर दिसत होती, तिला चेहऱ्यावर काही करण्याची गरज नव्हती.’

Disha Patani
अनिल कपूर म्हणाले, "या अभिनेत्रीसाठी माझ्या पत्नीलाही सोडायला तयार"
Disha Patani
हाच तो राखी सावंतचा नवरा; अखेर फोटो आला समोर

दिशा पटानी ही लवकरच मोहित सुरीच्या एक विलन २ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच ती टायगर श्रॉफसोबत हिरोपंती २, बागी ४ आणि गणपत या चित्रपटात काम करणार आहे. दिशा याआधी सलमान खानच्या 'राधे' या चित्रपटात झळकली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com