किसिंग सीनमुळे साईपल्लवीने नाकारला 'या' सुपरस्टारचा 'हा' बिगबजेट चित्रपट

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 जुलै 2019

अर्जुन रेड्डीमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या विजय देवराकोंडाच्या सिनेमाला केवळ किसींग सीनमुळे दाक्षिणात्या अभिनेत्री साई पल्लवीने नकार दिला असल्याचे बोलले जात आहे.

हैद्राबाद : अर्जुन रेड्डीमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या विजय देवराकोंडाच्या सिनेमाला केवळ किसींग सीनमुळे दाक्षिणात्या अभिनेत्री साई पल्लवीने नकार दिला असल्याचे बोलले जात आहे.

विजय लवकरच डिअर कॉमरेड या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विजयचा हा बहुप्रतिक्षित सिनेमा आहे. सुरुवातीला या सिनेमात सुप्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी काम करणार होती. मात्र आता या सिनेमात अभिनेत्री रश्मिका मंदाना दिसणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक किसिंग सीन आहे, या सीनमुळेच साईने चित्रपटाला नकार दिला असल्याचे बोलले जात आहे.

विजयचा हा बहुप्रतिक्षित सिनेमा आहे. सुरुवातीला या सिनेमात सुप्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी काम करणार होती. डिअर कॉमरेड सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये रश्मिका मंदाना आणि विजय यांचा एक हॉट किसिंग सीन आहे. सुरुवातीला हा किसिंग सीन साई पल्लवीवर शूट करण्यात येणार होता. मात्र तिने विजय देवरकोंडाला ऑन स्क्रिन किस करण्यास नकार दिला.

निर्माता आणि दिग्दर्शकांच्या मते ही कथेची गरज होती. मात्र साई पल्लवीने हा सीन करण्यास स्पष्ट नकार दिला. दिग्दर्शक आणि अभिनेत्रीच्या वादात अखेर पल्लवीला सिनेमातून काढण्यात आलं आणि तिच्या जागी रश्मिकाला घेण्यात आलं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Did Sai Pallavi reject Dear Comrade because of kissing scenes?