सुशांतच्या 'दिल बेचारा' ट्रेलरने तोडला वर्ल्ड रेकॉर्ड..

टीम ई सकाळ
मंगळवार, 7 जुलै 2020

या ट्रेलरने कमी वेळात करोडो लोकांनी पाहिलेला व्हिडिओ म्हणून आत्तापर्यंतचा वर्ल्ड रेकॉर्ड तोडला आहे. सुशांतचा हा शेवटचा सिनेमा असल्याने त्याच्या चाहत्यांसाठी ही खूप भावूक आठवण आहे.

मुंबई- दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा सिनेमा 'दिल बेचारा'चा ट्रेलर ६ जुलैला रिलीज झाला. हा ट्रेलर प्रेक्षकांच्या चांगलाच पसंती पडला आहे. या ट्रेलरने कमी वेळात करोडो लोकांनी पाहिलेला व्हिडिओ म्हणून आत्तापर्यंतचा वर्ल्ड रेकॉर्ड तोडला आहे. सुशांतचा हा शेवटचा सिनेमा असल्याने त्याच्या चाहत्यांसाठी ही खूप भावूक आठवण आहे.

हे ही वाचा:  अक्षय कुमारच्या 'बेलबॉटम' सिनेमाचं ऑगस्टमध्ये सुरु होणार शूटींग.. 

सुशांतचा शेवटचा सिनेमा म्हणून या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये आधीपासूनंच उत्सुकता होती. या सिनेमाचा बहुचर्चित ट्रेलर येण्याआधी सोशल मिडियावर ५५ हजार लाईक्स मिळाले होते. तर हा ट्रेलर पाहून लोकांच्या ज्या प्रतिक्रिया दिसून येत आहे त्यात त्यांचं सुशांतविषयीचं प्रेम पाहायला मिळत आहे. युट्युबवर या सिनेमाचा ट्रेलर नंबर एकवर ट्रेंडिंग आहे. इतकंच नाही तर ही बातमी लिहेपर्यंत या ट्रेलरचे व्ह्युजनी २३ कोटींचा टप्पा पार केला होता. 

विशेष म्हणजे हा ट्रेलर रिलीज झाल्यावर केवळ ९८ मिनिटांत १ कोटी पेक्षा जास्त व्ह्युज मिळाले होते. तर पाच तासात प्रेक्षकांच्या व्ह्युजचा आकडा २ कोटींच्याही वर गेला होता. सुशांतच्या या ट्रेलरवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत. सुशांतच्या चाहत्यांची इच्छा होती की त्याचा हा शेवटचा सिनेमा असल्याने तो मोठ्या पडद्यावर थिएटरमध्ये रिलीज व्हावा. मात्र कोरोना व्हायरसच्या संकटामुळे ते शक्य होऊ शकत नाही.

अखेर निर्मात्यांनी हा सिनेमा २४ जुलै रोजी ओटीटीवर रिलीज करणार असण्याची घोषणा केली. दिल बेचारा हा सिनेमा कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाब्रा यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमात सुशांतसोबत संजना सांघी, सैफ अली खान आणि स्वस्तिका मुखर्जी देखील महत्वाच्या भूमिकेत आहेत. हा सिनेमा 'द फॉल्ट इन अव्हर स्टार्स' या पुस्तकावर आधारित आहे.    

dil bechara trailer becomes the fastest video in the world to cross 1 million likes on youtube


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dil bechara trailer becomes the fastest video in the world to cross 1 million likes on youtube