आता जेठालालही म्हणतोय, 'दया परत ये'

वृत्तसंस्था
Saturday, 13 July 2019

दयाऐवजी विभूती शर्मा नाही 

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील दया ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. दिशा वाकानी यांची ही भूमिका चांगलीच गाजली आहे. मात्र, मालिकेत त्यांचा चेहरा दिसत नसल्याने दयाबेन यांना पुन्हा परतण्याची मागणी चाहत्यांकडून केली जात आहे. असे असताना आता या मालिकेतील दयाचा पती जेठालाल म्हणजेच अभिनेते दिलीप जोशी यांनीदेखील दया परत यावी, यासाठी प्रार्थना सुरु केली आहे.

गरोदरपणासाठी दिशा वाकानी यांनी मालिकेतून काही महिन्यांपासून सुट्टी घेतली आहे. मात्र, मालिकेत त्यांची भूमिका नसल्याने चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे. ''दिशा वाकानी गरोदरपणासाठी सुट्टीवर आहेत. त्यामुळे त्या मालिकेत लगेच कशा काय परत येतील. मात्र, त्या मालिकेत असणार हे नक्की याचा मला विश्वास आहे. सध्यातरी त्यांच्याऐवजी कोणीही ही भूमिका बजावणार नाही'', असे दिलीप जोशी यांनी सांगितले. 

दयाऐवजी विभूती शर्मा नाही 

दिशा वाकानी मालिकेत परतणार नसल्याचे गेल्या काही दिवसांपासून सांगितले जात होते. तसेच त्यांच्याजागी विभूती शर्मा यांची निवड झाल्याची चर्चा होती. मात्र, याबाबत कोणतीही सत्यता नसून, ही एकप्रकारची अफवा असल्याचे समोर आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dilip Joshi says he is praying Disha Vakani will want to come back soon