Dilip Kumar Birth Anniversary: सेन्सॉर बोर्डानं सांगितले 250 कट्स तरीही बॉक्स ऑफिसवर केली तुफान कमाई!

प्रतिभावंत अभिनेते दिलीप कुमार यांच्याविषयी जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे. तब्बल पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
Dilip Kumar Birth Anniversary 2023
Dilip Kumar Birth Anniversary 2023 esakal

Dilip Kumar Birth Anniversary 2023 : प्रतिभावंत अभिनेते दिलीप कुमार यांच्याविषयी जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे. तब्बल पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचे मनोरंजन केले. भारतातील सर्वाधिक लोकप्रिय आणि चाहत्यांकडून अलोट प्रेम मिळवलेल्या अभिनेत्यांमध्ये दिलीप कुमार यांचे नाव घ्यावे लागेल.

बॉलीवूडमध्ये ट्रॅजेडी किंग म्हणून दिलीप कुमार यांचे नाव घ्यावे लागेल. आज त्यांची आज बर्थ अॅनिव्हर्सरी असून त्यानिमित्तानं त्यांच्या चाहत्यांनी या महान अभिनेत्याच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. त्यात त्यांच्या काही चित्रपटांविषयीचे किस्सेही समोर आले आहेत. दिलीप कुमार यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले. त्याची चर्चाही झाली. मात्र या सगळ्यात एका चित्रपटानं कायमच त्यांना लाईमलाईटमध्ये ठेवले तो चित्रपट म्हणजे गंगा जमूना.

या चित्रपटाविषयी सेन्सॉर बोर्डाकडून निर्मात्यांची चांगलीच कानउघाडणी करण्यात आली होती. तेव्हा या चित्रपटाला बोर्डानं तब्बल २५० कट्स सांगितले होते. त्यामुळे मेकर्सची डोकेदुखी वाढली होती. १९४४ मध्ये ज्वार भाटा नावाच्या चित्रपटातून दिलीप कुमार यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांच्या आलेल्या अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांची पसंती मिळवली होती.

२०२१ मध्ये दिलीप कुमार यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्यानं भारतीय चित्रपट विश्वाला मोठा हादरा बसला होता. आज त्यांच्या बर्थ अॅनिव्हर्सरीच्या निमित्तानं चाहत्यांनी वेगवेगळ्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यात गंगा जमुनाची गोष्टच वेगळी होती. १९६१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटावर सेन्सॉर बोर्डानं काही दृष्यांबाबत आक्षेप घेतला होता. त्याचे दिग्दर्शन नितीन बोस यांनी केले होते.

वैजंयती माला, नासिर खान, हेलेन, अरुणा ईरानी हे कलाकार या चित्रपटामध्ये होते. दोन भावांचा संघर्ष या चित्रपटामध्ये दाखवण्यात आला आहे. गंगा जमुनामध्ये दिलीप कुमार यांनी गंगाराम तर नासिर खान यांनी पोलिस अधिकारी जमुनाची भूमिका साकारली होती. असं म्हटलं जातं की, दिलीप कुमार यांनी देखील या चित्रपटाचे लेखन केले होते. तसेच निर्मात्याच्या भूमिकेत होते. यावेळी सेन्सॉर बोर्डानं या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती.

त्यावेळच्या सेन्सॉर बोर्डानं या चित्रपटातील काही दृष्यांवर आक्षेप नोंदवत त्याला अश्लिलता असे म्हटले होते. त्यामुळे त्यांनी या चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यास नकार दिला होता. असं झाल्यानंतर दिलीप कुमार यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. यानंतर दिलीप कुमार यांनी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची भेट घेतली होती.

Dilip Kumar Birth Anniversary 2023
Animal Movie: "मला कोणत्याही प्रकारचा संकोच...", लग्नातल्या 'त्या' सीनवर वाद वाढताच बॉबीनं सोडलं मौन!

पीएम यांच्या हस्तक्षेपानंतर चित्रपटाचा पुढील प्रवास सोपा झाला होता. प्रसिद्ध वकील रमेश सांघवी यांच्या पुढाकारानं गंगा जमुना हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्याचे सांगण्यात येते. गंगा जमुनानं बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई देखील केली होती. या चित्रपटातील वैजयंती माला यांच्या भूमिकेनं त्यांना त्या वर्षीचे फिल्म फेयर मिळवून दिले होते.

Dilip Kumar Birth Anniversary 2023
Dunki Drop 5: 'ओ माही' ची झलक सबसे अलग , किंग खानचा हटके स्वॅग! शाहरुखचा पुन्हा मोठा धमाका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com