अभिनेते दिलीप कुमार यांना त्यांच्या दोन्ही भावांच्या निधनाची कल्पना नाही, सायरा यांनी सांगितलं कारण

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Friday, 4 September 2020

२० दिवसाच्या आत एकामागोमाग एक दिलीप कुमार यांच्या दोन्ही भावांनी जगाचा निरोप घेतला. दिलीप कुमार यांची पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांनी सांगितलं की दिलीप कुमार यांना त्यांच्या भावांच्या निधनाविषयी सांगितलेलं नाही.

मुंबई- ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे दोन्ही लहान भाऊ अहसान खान आणि असलम खान यांचं कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झालं. २० दिवसाच्या आत एकामागोमाग एक दोन्ही भावांनी जगाचा निरोप घेतला. दिलीप कुमार यांची पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांनी सांगितलं की दिलीप कुमार यांना त्यांच्या भावांच्या निधनाविषयी सांगितलेलं नाही.

हे ही वाचा:  साडेतीन तासांच्या सर्च ऑपरेशननंतर NCB ने शौविक चक्रवर्तीला चौकशीसाठी घेतलं ताब्यात  

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच वय ९७ आहे. त्यांची पत्नी सायरा यांच्यावतीने ट्विटरवर त्या दिलीप कुमार यांचे हेल्थ अपडेच देत असतात. नुकत्याच एका मुलाखतीत सायरा यांनी सांगितलं की त्या दिलीप कुमार यांना त्रास होईल अशा बातम्यांपासून लांब ठेवतात. त्यांनी ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की 'खरं सांगायचं झालं तर दिलीप साहेब यांना असलम भाई आणि अहसान भाई यांच्या जाण्याविषयी देखील सांगितलेलं नाही. आम्ही त्यांना त्रास होईल अशा बातम्यांपासून दूर ठेवतो.'

सायरा यांनी सांगितलं की 'अमिताभ बच्चन यांना कोरोना झाल्याचं देखील आम्ही दिलीप साहेब यांना सांगितलं नव्हतं.' त्या सांगतात की 'ते अमिताभ बच्चन यांना खूप पसंत करतात'. दिलीप कुमार यांच्या प्रकृतीबाबत सायरा यांनी सांगितलं की 'ते क्वारंटाईन आहेत. मात्र त्यांचं ब्लड प्रेशरमध्ये काही बदल होत नाहीये. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.' मार्चमध्ये दिलीप कुमार यांनी त्यांचे हेल्थ अपडेट दिले होते. त्यांनी ट्विट करुन चाहत्यांना सांगितलं होतं की 'मी कोरोना व्हायरसच्या कारणामुळे पूर्णपणे आयसोलेशनमध्ये आहे. सायराने मला इनफेक्शन होऊ नये यासाठी कोणतीच कसर बाकी ठेवली नाही.'  

dilip kumar is not aware that his 2 brothers ehsaan aslam died tells saira banu  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dilip kumar is not aware that his 2 brothers ehsaan aslam died tells saira banu