
ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो आणि दिलीप कुमार यांच्याकडे पाहिलं की प्रेम म्हणजे काय याचा खरा अर्थ उलगडतो. बॉलिवूडमधील एव्हरग्रीन कपल म्हणून या जोडीकडे पाहिलं जात होतं. मात्र, नियतीमुळे या दोन व्यक्ती आज एकमेकांपासून दुरावल्या. ‘ट्रॅजेडी किंग’ असं बिरुद मिरवणाऱ्या दिलीप कुमार यांचं आज ( ७ जुलै) निधन झालं. गेल्या कित्येक दिवसांपासून दिलीप कुमार आजारी होते. मात्र, त्यांच्या या परिस्थितीमध्येही सायरा बानो यांनी खंबीरपणे त्यांची साथ दिली. केवळ साथच दिली नाही तर या नात्यातील प्रेम, जिव्हाळा शेवटपर्यंत टिकून राहावा यासाठी प्रयत्न केलं. विशेष म्हणजे सध्या सायरा बानो आणि दिलीप कुमार यांच्या प्रेमाविषयी, त्यांच्या नात्याविषयी सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या आहेत. त्यामध्येच या दोघांना आयुष्यात एक उणीव कायम भासत राहिली असं म्हटलं जात आहे. (dilip-kumar-saira-banu-interesting-love-story)
सायरा बानो आणि दिलीप कुमार यांना आयुष्यभर एक उणीव सतत भासत राहिली ती म्हणजे मुलाची. दिलीप कुमार व सायरा बानो यांना मूलबाळ काहीच नव्हतं हे सगळ्यांनाच ठावूक आहे. पण फार कमी लोकांना त्यामागचे कारण माहित आहे. दिलीप कुमार यांनी त्यांचे आत्मचरित्र ‘द सबस्टान्स अँड द शॅडो’मध्ये याबाबत लिहिले आहे.
१९७२ मध्ये सायरा पहिल्यांदा गरोदर होत्या. त्या आठ महिन्यांच्या गर्भवती असताना त्यांना रक्तदाबाचा त्रास होऊ लागला. त्यावेळी त्यांच्या पोटातील बाळाची वाढ जवळपास पूर्ण झाली होती. पण बाळाला वाचवण्यासाठी सर्जरी करणे शक्य नव्हते. त्यामुळे श्वास कोंडून बाळाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सायरा बानो कधीही आई बनू शकल्या नाहीत.
दिलीप कुमार-सायरा बानो यांची लव्हस्टोरी
साठच्या दशकातील विनोदी अभिनेत्री नसीम बानू यांची कन्या सायरा ‘आन’ या चित्रपटातील दिलीप कुमार यांच्या अभिनयाने प्रभावित झाल्या. दिलीप कुमार यांच्या ब्लॉकबस्टर ‘मुघल-ए-आझम’च्या प्रिमिअर दरम्यान दिलीप कुमार अनुपस्थित होते. त्यामुळे त्यांची ही अनुपस्थिती सायरा यांच्या चांगलीच जिव्हारी लागली होती. त्यानंतर सरतेशेवटी सायरा बानू एका मुलाखती दरम्यान दिलीप कुमार यांना भेटल्या. त्यावेळी दिलीप कुमार यांनी सायराला सुंदर मुलगी असल्याचे म्हटले होते. सायरांना यावेळी मनात खोलवर दिलीप कुमार यांच्याशीच आपला विवाह होईल असे वाटले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.