Diljit Dosanjh Birthday: सिनेमांआधी किर्तनं गात होता दिलजीत दोसांज, 'उडता पंजाब'ने बदललं नशीब

आज सुप्रसिद्ध गायक - अभिनेता दिलजीत दोसांजचा वाढदिवस
diljit dosanjh birthday special know how punjabi star became famous bollywood actor
diljit dosanjh birthday special know how punjabi star became famous bollywood actorSAKAL

Diljit Dosanjh Birthday: आज दिलजीत दोसांजचा वाढदिवस. पंजाबसोबतंच हिंदी सिनेसृष्टीचा प्रसिद्ध गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांजचा जन्म ६ जानेवारी १९८४ रोजी झाला. यावेळी दिलजीत त्याचा ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे.

दिलजीत सुरुवातीपासूनंच पंजाबी इंडस्ट्रीत तर त्याची जादू दाखवतोय मात्र आता त्याने बॉलीवूडमध्येही त्याचा पाय चांगलाच रोवलाय.

केवळ गायक म्हणून नाही तर बॉलीवूड सिनेमांमध्ये त्याने अभिनयाची चुणूक देखील दाखवली आहे.  दिलजीतच्या वाढदिवसानिमित्ता त्याच्या काही खास गोष्टी जाणून घेऊ.

दिलजीतच्या वडिलांचं नाव बलबीर सिंह आणि आईचं नाव सुखविंदर कौर आहे. दिलजीतचे वडिल पंजाब रोडवेजचे निवृत्त कर्मचारी आहेत. दिलजीतला एक छोटा भाऊ आणि एक मोठी बहीण आहे. दिलजीतने त्याच्या शिक्षणासोबतंच त्याचं गाण्याचं करिअर देखील सुरु ठेवलं. सुरुवातीच्या दिवसात दिलजीत किर्तनमध्ये गायचा. त्याने त्याच्या करिअरची सुरुवात २००४ मध्ये त्याचा पंजाबी अल्बम 'इश्क दा उडा एडा'ने केली. त्यानंतर २००९मध्ये  त्याने रॅपर हनी सिंहसोबत 'गोलिया' गाणं गायलं ज्यामुळे तो आंतराष्ट्रीय स्टार बनला.

२०११ मध्ये 'द लायन ऑफ पंजाब' सिनेमाच्या माध्यमातून त्याने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्याच्या 'जट्ट एँड जुलिएट'  आणि 'जट्ट एँड जुलिएट २' ने पंजाबी सिनेमाचे सगळे रेकॉर्ड ब्रेक केले. २०१४ मध्ये आलेल्या अनुराग सिंहच्या 'पंजाब १९८४' मधील दिलजीतच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं. त्यानंतर त्याला बॉलीवूडचं दार खुलं झालं.

२०१६ मध्ये अभिषेक चौबे दिग्दर्शित 'उडता पंजाब' सिनेमात त्याने मुख्य भूमिका साकारली. या सिनेमातील भूमिकेसाठी त्याला फिल्मफेअर आणि आयफा पुरस्काराने  बेस्ट डेब्यु अभिनेत्याचा पुरस्कार दिला. या सिनेमाचं त्याचं नशीब बदललं आणि मग त्याने मागे वळून पाहिलं नाही. 'उडता पंजाब'च्या यशानंतर दिलजीतने 'फिल्लौरी', 'सूरमा' आणि 'गुड न्युज' सारख्या सिनेमांमध्ये दिसून आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com