पगडीसाठी सिनेमांना लाथ मारणारा दिलजित 'अमर सिंह चमकिला' मध्ये पगडीविना दिसला..हे कसं झालं शक्य? Amar Singh Chamkila | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

amar singh chamkila biopic

Amar Singh Chamkila: पगडीसाठी सिनेमांना लाथ मारणारा दिलजित 'अमर सिंह चमकिला' मध्ये पगडीविना दिसला..हे कसं झालं शक्य?

Amar Singh Chamkila: अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझ याच्या आगामी 'अमर सिंह चमकिला' सिनेमाचा टीझर आज रिलीज झाला आहे. या सिनेमात अमर सिंह चमकिला यांची भूमिका दिलजीत दोसांझ साकारत आहे.

नेहमी पगडीत दिसणाऱ्या दिलजीतला नव्या लूकमध्ये ओळखणं मात्र कठीण झालंय. या सिनेमात दिलजीत पगडीशिवाय पहिल्यांदाच दिसत आहे. तुम्हाला कदाचित लक्षात असेल तर 'फिल्लौरी' प्रमोशनच्या वेळी दिलजीतनं म्हटलं होतं की, तो सिनेमा सोडू शकतो पण आपली पगडी कधीच उतरवणार नाही.(Diljit Dosanjh new look without pagri in imtiza ali chamkila amar singh chamkila biopic)

दिलजीत दोसांझचा पहिला सिनेमा फ्लॉप झाला होता. त्यावेळी फिल्म मेकर्सनी दिलजीतला म्हटलं होतं की पगडी घातलेले हिरो जास्त चालत नाहीत. लोकांना या पगडी लूकमध्ये तू आवडणार नाहीस. दिलजीतनं याचं उत्तर देत म्हटलं होतं की काही हरकत नाही असं असेल तर मी सिनेमात कामच करणार नाही.

अनुष्का शर्मासोबत दिलजीत दोसांझचा 'फिल्लौरी' सिनेमा आला होता त्यावेळी मुलाखती दरम्यान तो म्हणाला होता की, ''एका भूमिकेसाठी मी माझी पगडी उतरवणार नाही. मग भले मला काम मिळो वा ना मिळो. मी सिनेमासाठी पगडी घालणं सोडणार नाही''.

याआधी १९८४ च्या शीख दंगलींवर बनलेल्या 'जोगी' सिनेमात दिलजीत दोसांझ बिनापगडी दिसला होता. नेटफ्लिक्सवर आलेल्या या सिनेमात दिलजीत दंगलीमुळं आपले केस कापतो. हा सीन पाहिल्यानंतर त्याची आई खूप रडली होती. सिनेमातील सीन रिअॅलिस्टिक बनवण्यासाठी दिलजीतनं आपले केस कापले होते आणि आता पुन्हा एकदा 'चमकिला' मध्ये दिलजीत बिनापगडीमध्ये दिसत आहे.

'अमर सिंह चमकिला' या सिनेमात पंजाबी गायकाच्या भूमिकेत दिलजित दोसांझ आहे. सिनेमात दिलजीतसोबत परिणीती चोप्रा देखील दिसणार आहे. या सिनेमाला लवकरच नेटफ्लिक्सवर स्ट्रीम केलं जाणार आहे.

इम्तियाज अलीच्या या सिनेमात अमर सिंह चमकिला यांच्या आयुष्यातील माहित नसलेल्या अनेक गोष्टी कथेच्या माध्यमातून दिसतील. अमर सिंह चमकिला केवळ एक गायक नव्हते तर संगीतकार,गीतकार देखील होते. पंजाबमध्ये त्यांचं मोठं नाव होतं.

चमकिला यांना पंजाबचा बेस्ट लाइव्ह स्टेज परफॉर्मर मानलं जातं. बोललं जातं की चमकिला यांच्यासारखा परफॉर्मर पंजाबमध्ये आजपर्यंत जन्माला आलेला नाही.

अमर सिंह चमकिला यांना लहानपणापासूनच गायनाची आवड होती. त्यांनी ढोलकी आणि हार्मोनियम शिकलं आणि संगीताच्या विश्वात पाऊल ठेवलं.

बोललं जातं की त्यांनी एका कपड्याच्या मिलमध्ये देखील काम केलं होतं. याचं कारण होतं कुटुंबाची आर्थिक स्थिती.