Dinanath Mangeshkar Awards: 'लता मंगेशकर स्मृती पुरस्कार' आशा भोसलेंना प्रदान, भावाच्या हस्ते मिळाल्याने आशाताई आनंदी

हा पुरस्कार सोहळा २४ एप्रिल रोजी मुंबईतील पष्णमुखानंद सभागृहात पार पडला
Dinanath Mangeshkar Awards, Dinanath Mangeshkar Awards 2023, asha bhosle, vidya balan, pankaj udhas
Dinanath Mangeshkar Awards, Dinanath Mangeshkar Awards 2023, asha bhosle, vidya balan, pankaj udhasSAKAL

81st Dinanath Mangeshkar Award News: मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानातर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा काहीच दिवसांपूर्वी झाली.

यामध्ये ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना लता मंगेशकर स्मृती पुरस्कार तसेच इतर पुरस्कारांमध्ये बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन आणि मराठमोळा अभिनेता प्रसाद ओक या कलाकारांचीही समावेश होता.

24 एप्रिल रोजी हा पुरस्कार सोहळा मुंबईत पार पडला आहे. (81st master Dinanath Mangeshkar Award 2023 Announced)

Dinanath Mangeshkar Awards, Dinanath Mangeshkar Awards 2023, asha bhosle, vidya balan, pankaj udhas
गालावर थरथरते साय दुधाची.. अंगावर चव धरते गोड मधाची.. Sayali Deodhar

आशा भोसलेंना हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात आला. भाऊ हृदयनाथ यांच्या हस्ते दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळाल्याने आशा भोसले प्रचंड आनंदी होत्या.

गेल्यावर्षीपासून मंगेशकर कुटुंबीयांकडून देण्यात येणाऱ्या 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारा'च्या यंदाच्या मानकरी आशा भोसले ठरल्या.

यंदाचं या पुरस्कारांचं ८१ वं वर्ष आहे. या विविध पुरस्कारांचे मानकरी पुढील प्रमाणे आहेत....

आशा भोसले - लता मंगेशकर स्मृती पुरस्कार

पंकज उदास - संगीत पुरस्कार

प्रशांत दामले - नाटक

प्रसाद ओक - सिनेमा

विद्या बालन - सिनेमा

श्री सदगुरू सेवा संघ - समाजसेवा

ग्रंथाली प्रकाशन - साहित्य

हा पुरस्कार सोहळा २४ एप्रिल रोजी मुंबईतील पष्णमुखानंद सभागृहात सायंकाळी ६ वाजता पार पडला. सोहळ्याची सुरुवात सांस्कृतीक कार्यक्रमांनी झाली.

यावेळी कथक नृत्य, राहुल देशपांडे यांची गाण्यांची मैफील रंगली असून कार्यक्रमाची सांगता ज्येष्ठ गायक हरिहरन यांच्या गायनानं झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com