Circuitt Marathi Movie: इथे कुणीच कुणाचं नाही, 'सर्किट' चित्रपटाला बसला इंडस्ट्रीतल्या लॉबीचा फटका..

Circuitt Marathi Movie: 'सर्किट' चित्रपटाचे दिग्दर्शक आकाश पेंढारकर यांनी व्यक्त केली खंत..
director akash pendharkar said Circuitt Movie faced marathi industry lobby politics
director akash pendharkar said Circuitt Movie faced marathi industry lobby politicssakal

circuitt movie box office collection: हाय व्होल्टेज ड्रामा आणि रोमान्स असलेल्या 'सर्किट' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. आज या चित्रपटाला प्रदर्शित होऊन तीन दिवस झाले तरी बॉक्स ऑफिसवर मात्र हा चित्रपट फारशी कमाई करून शकलेला नाही.

मधुर भांडारकर यांची निर्मिती असलेला आणि आकाश पेंढारकर यांनी दिग्दर्शित केलेला केलेलं हा सिनेमा खूप चालेल अशी चर्चा होती. अगदी हृता दुर्गुळे आणि वैभव तत्ववादी यांची प्रमुख भूमिका असूनही हा चित्रपट फारसा यशस्वी झाल्याचं दिसत नाहीय.

या सगळ्यामागे मराठी मनोरंजन विश्वातील लॉबी पॉलिटिक्स आहे अशी खंत चित्रपटाचे दिग्दर्शक आकाश पेंढारकर यांनी एका मुलाखतीत व्यक्त केली. त्यांचा हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे.

(director akash pendharkar said Circuitt Movie faced marathi industry lobby politics)

director akash pendharkar said Circuitt Movie faced marathi industry lobby politics
Viral Video: आम्हालाही मोह आवरता आला नाहीच.. मोस्ट ट्रेंडींग गाण्यावर थीरकले केदार-अंकुश-भरत..

सौमित्र पोटे यांच्या ''मित्र म्हणे'' या पॉडकास्टमध्ये 'सर्किट'चे दिग्दर्शक आणि भालजी पेंढारकर यांचे पणतू आकाश पेंढारकर सहभागी झाले होते. यावेळी तुम्हाला इंडस्ट्रीमधल्या कोणत्या गोष्टीचा फार राग येतो असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.

त्यावर ते म्हणाले, ''इंडस्ट्रीत कुणीच खरं नाहीये एकमेकांसाठी. इंडस्ट्रीत मित्र बनवणं ही खूप अवघड गोष्ट आहे. या गोष्टीचा इतका राग येऊ शकतो ना की लोकं आता तुमच्याबरोबर चांगलं बोलतात आणि तुम्ही वळायच्या आत तुमच्याबद्दल वाईट बोलतात.''

''हे थांबत नाही कारण आपण म्हणतो ना की एखाद्या इंडस्ट्रीला एखादा शाप लागलेला असतो. पण मी म्हटलं तसं इथे लॉबिंगसुद्धा खूप जास्त आहे. सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये असतं, मला माहितीये. पण इथे मजबूत लॉबिंग आहे. फक्त ते कुणी बोलत नाही. तुम्ही बघाल की एका कुठल्या तरी चित्रपटाच्या ग्रुपमध्ये तीच तीच लोकं दिसतात. तेच असतात.''


पुढे ते म्हणाले की , 'एकमेकांना इथे तिथे काम करू नको असंही सांगण्यात येतं. 'सर्किट'च्या बाबतीत झालंय. काही लोकांना या चित्रपटात काम नको करुस नाहीतर हे हे होईल असं सांगण्यात आलंय. हे होतच. म्हणून मी म्हणालो इथे खूप लॉबिंग आहे फक्त ते समोर दिसत नाही किंवा दिसू देत नाहीत.' असा धक्कादायक अनुभव त्यांनी सांगितला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com