esakal | दिग्दर्शक अनंत महादेवनचा "बिटरस्वीट" चित्रपट, 'बुसान फिल्म फेस्टिव्हलमध्ये'!
sakal

बोलून बातमी शोधा

दिग्दर्शक अनंत महादेवनचा "बिटरस्वीट" चित्रपट, 'बुसान फिल्म फेस्टिव्हलमध्ये'!

अनंत नारायण महादेवन दिग्दर्शित "बिटरस्वीट" (कडू गोड) या मराठी चित्रपटाची  बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अधिकृत निवड झाली आहे.

दिग्दर्शक अनंत महादेवनचा "बिटरस्वीट" चित्रपट, 'बुसान फिल्म फेस्टिव्हलमध्ये'!

sakal_logo
By
संतोष भिंगार्डे


मुंबई ः अनंत नारायण महादेवन दिग्दर्शित "बिटरस्वीट" (कडू गोड) या मराठी चित्रपटाची  बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अधिकृत निवड झाली आहे. याचप्रमाणे प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या जिसेक पुरस्कारासाठीही या चित्रपटाचे नामांकन झाले आहे. मराठीसाठी तसेच संपूर्ण भारतासाठी ही अभिमानास्पद बाब आहे.  

अभिनेत्री जया बच्चन यांच्या सुरक्षेत महाराष्ट्र सरकारने केली वाढ 

याबद्दल अनंत नारायण महादेवन म्हणाले, "आशियाई खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये हा चित्रपट निवडला गेला याचा आनंद आहे. तसेच जिसेक पुरस्कारासाठी या चित्रपटाचे नामांकन झाले आहे. त्यामुळे आमच्यासाठी ही खूप महत्त्वाची बाब आहे. आम्ही मेहनत घेऊन बनवलेल्या चित्रपटाचे जागतिक स्तरावर कौतुक होणे याचे श्रेय आमच्याप्रमाणेच मी चित्रपट निर्मात्या सुचंदा आणि शुभा शेट्टी यांनाही देतो."
 या चित्रपटाचे निर्मात्या सुचंदा आणि शुभा शेट्टी याही याबाबत आनंद व्यक्त केला व म्हणाल्या, "जेव्हा अनंतने आम्हाला या चित्रपटाची कथा ऐकवली तेव्हा ती आम्हाला खुप आवडली आणि हा चित्रपट, ही कथा लोकांसमोर आलीच पाहिजे असं आम्हाला वाटलं म्हणून आम्ही हा चित्रपट करायचा असं ठरवलं. निर्माते म्हणून आमचा हा पहिलाच चित्रपट आहे आणि इतक्या मोठ्या स्तरावर त्याला यश मिळतंय हे पाहून आम्हाला खूप आनंद होत आहे."

सुजैन खानने फोटो शेअर करत म्हटलं, जर तु सोडून गेलास.., हृतिक रोशनने केली अशी कमेंट

   "बिटरस्वीट" या चित्रपटात महिला ऊस तोड कामगार यांच्या जीवनावर बेतलेली ही कथा आहे. महिला उसतोड कामगारांचे होणारे शोषण आणि त्यांना आपल्या अस्तित्वासाठी द्यावा लागणारा लढा याचे चित्रण या चित्रपटात आहे. महेंद्र पाटील यांनी या चित्रपटाचे संवाद लिहिले आहे. स्मिता तांबे, अक्षया गुरव, अनिल नगरकर, असित रेडीज या कलाकारांनी यामध्ये काम केले आहे. यंदाचा बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 21 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत पार पडणार आहे.

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )