शेतक-यांना लस हवी? हलवा है क्या; अशा भाषेत कोणी बोलतं का?

director Ashoka pandit reaction on Rakesh tikait tweet for asking corona vaccine for protesting farmers
director Ashoka pandit reaction on Rakesh tikait tweet for asking corona vaccine for protesting farmers


मुंबई - देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर अद्याप प्रभावी उपाययोजना नसल्यानं लोकांच्या मनात भीती आहे. लशीची निर्मिती झाली आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण होत आहे. लोकांना लसीकरण करावे म्हणून आवाहनही करण्यात आले आहे. मात्र नागरिक स्वयंशिस्त घेण्यात कमी पडत असल्यानं त्याचा परिणाम सर्वांवर होत असल्याचे दिसुन आले आहे. यासगळ्यात अनेकजण अशा परिस्थितीत वाद कसा निर्माण होईल याकडे लक्ष देत आहे. काहींनी जाणीवपूर्वक तसा प्रयत्न केल्याचे दिसुन आले आहे. दिल्लीत शेतीविषयक धोरणांना विरोध करणा-या शेतकरी आंदोलकांना कोरोनाची लस द्यावी अशी मागणी ज्यावेळी करण्यात आली तेव्हा एका दिग्दर्शकांने दिलेली प्रतिक्रिया वादग्रस्त ठरली आहे.

कृषीविषेयक कायद्यांना विरोध करणा-या शेतक-यांना कोरोनाची लस द्यावी अशी मागणी त्या शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकेत यांनी केली होती. त्यावर बॉलीवूडचे प्रसिध्द दिग्दर्शक अशोक पंडित यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय बनली आहे. टिकेत यांनी मागणी केल्यानंतर अनेकांनी त्याला प्रतिसाद देत शेतक-यांना तातडीनं लस द्यावी अशी मागणी केली होती. त्यावर बॉलीवूडमधल्या एका दिग्दर्शकांनं उडी घेतली आहे. त्यामुळे त्यांच्यात वाद निर्माण झाला आहे. आता तो वाद शांत कसा होईल यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

बी टाऊन चे प्रसिध्द दिग्दर्शक अशोक पंडित यांनी भारतीय शेतकरी युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकेत यांच्या मागणीवर जहरी टीका केली आहे. राकेश यांनी आंदोलनातील शेतक-यांना कोरोना प्रतिबंधक लस द्यावी अशी मागणी केली होती. त्यावर अशोक पंडित यांनी म्हटले आहे की, हलवा है क्या..तुम्हाला काय तिकडचं सगळं आणून द्यायचे का? अशा भाषेत अशोक यांनी राकेश यांच्य़ावर टीका केली आहे. 
खर तर शेतकरी कायद्याच्या विरोधात दिल्लीत शेतकरी आंदोलन करत आहेत. दुसरीकडे गाझीपूर बॉर्डरवर शेतक-यांचे धरणे आंदोलन सुरु आहे. आंदोलनस्थळी कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी शेतक-यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मागणी राकेश टिकेत यांनी केली होती. आता त्यावर प्रशासन काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अद्याप आंदोलनकर्त्यांनी कुणालाही दाद दिली नसल्यानं सरकार आणि त्यांच्यातील वाद आणखी चिघळताना दिसतो आहे.

दिल्लीतील आंदोलनाबाबत अद्याप कुठलाच तोडगा न निघालेला नाही. आंदोलनस्थळी कोरोनाच्या नियमांचे पालन केले जात आहे. टिकेत यांनी सांगितले होते की, आंदोलनस्थळी आम्ही कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करत आहोत. जोपर्यत सरकार कृषीविषयक धोरणांचा आमच्या बाजूनं विचार करत नाहीत तोपर्यत हा लढा सुरुच राहणार असल्याची माहिती टिकेत यांनी यावेळी दिली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com