कंगना राणावत घेणार 'पंगा'; दिग्दर्शक अश्विनी यांनी शेअर केला व्हिडीओ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

दिग्दर्शक अश्विनी अय्यर तिवारी यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर व्हिडीओ शेअर करत 'पंगा' सिनेमाची अधिकृत माहिती देत कंगना राणावत, पंजाबी गायक-अभिनेता जस्सी गिल आणि अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत, हे सांगितले आहे. 

मुंबई : बॉलिवूड क्वीन अभिनेत्री कंगना राणावत आता मैदानात उतरुन कबड्डी खेळणार आहे. 'पंगा' या नवीन सिनेमात कंगना दिसणार आहे. राष्ट्रीय कबड्डीपटूच्या भूमिकेत ती दिसणार आहे. 

दिग्दर्शक अश्विनी अय्यर तिवारी यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर व्हिडीओ शेअर करत 'पंगा' सिनेमाची अधिकृत माहिती देत कंगना राणावत, पंजाबी गायक-अभिनेता जस्सी गिल आणि अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत, हे सांगितले आहे. 

'माझ्या असण्याची वास्तविकता हे माझ्या आप्तजनांचा माझ्यावरच्या विश्वासाचे प्रतिबिंब आहे. अशा परिवाला समर्पित प्रस्तुतकर्ते 'पंगा' कंगना राणावत, जस्सी गिल, नीना गुप्ता. फॉक्स स्टार हिंदी द्वारे निर्मित.' असे ट्विट दिग्दर्शक अश्विनी तिवारी यांनी करत व्हिडीओ शेअर केला आहे.

'पंगा मध्ये राष्ट्रीय कबड्डी खेळाडूची भूमिका करण्यास मला आनंद होत आहे. अश्विनी आणि फॉक्स स्टार सोबत काम करण्यासही मी उत्सुक आहे', असे कंगनाने सिनेमाबद्दल मत व्यक्त केले आहे. 'पंगा' 2019 मध्ये प्रदर्शित होईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Director Ashwiny Iyer Tiwari Announced Panga Movie With Kangana Ranaut