'सही रे सही' पुन्हा येणार? केदार शिंदेंच्या पोस्टने वेधलं लक्ष

केदार शिंदे, भरत जाधव, अंकुश चौधरीचं 'पुन्हा सही रे सही'
kedar bharat ankush
kedar bharat ankush

नाट्यरसिकांच्या मनावर आपली छाप पाडणाऱ्या 'सही रे सही' Sahi Re Sahi या नाटकाला १५ ऑगस्ट रोजी १९ वर्षे पूर्ण झाली. मराठी नाटकांमधल्या सर्वांत यशस्वी नाटकांपैकी एक हे नाटक आहे. दिग्दर्शक केदार शिंदेंनी Kedar Shinde या नाटकाबद्दल एक पोस्ट लिहित 'सही रे सही' पुन्हा येणार असल्याचे संकेत दिले.

केदार शिंदेंची पोस्ट-

'पुन्हा सही रे सही.. १९ वर्षे आज पूर्ण होतायत. १५.०८.२००२ रोजी हा 'सही' रथ ज्या भरधावाने निघाला तो अजूनही त्याच वेगात आहे. मला अजूनही आठवतो तो दिवस. माझ्या टाटा इंडिका गाडीतून मी आणि भरत, शिवाजी मंदिरच्या दिशेने निघालो. तेव्हा एकच गोष्ट मी भरतला वारंवार सांगत होतो. “भरत आज दिवस तुझा आहे. जे जे आजपर्यंत करावसं वाटत होतं, ते साकार करण्याचा आजचा दिवस आहे. मी पडदा उघडल्यावर पडद्यामागे असणार. रंगमंच तुझा असणार आहे. त्यामुळे बागड त्या रंगमंचावर! आपल्या आण्णांनीच तो रंगमंच बांधलाय असं समज!” आणि.. भरत जाधव याने परत परत परत परत तेच केलं. तब्बल १९ वर्षे. या संपूर्ण प्रवासात त्याच्या सोबत त्याच तडफेने काम करणारे कलाकार आणि पडद्यामागचे तंत्रज्ञ, त्यांचं प्रेम अजूनही या जादूई नाटकावर तेवढच आहे आणि तेवढच राहील.'

'मी मुलीच्या बापाच्या भूमिकेत होतो आणि राहीन! आपण लाडाने प्रेमाने मुलीला वाढवायचं आणि योग्य वेळी तीचं लग्न लावल्यावर तीचा सुखाचा संसार पाहायचा. या दरम्यान मुलीला काही अडचण, त्रास झाला तर वेळोवेळी तत्परतेने पाठीशी उभंही राहायचं. माझ्या या मुलीचं लग्न भरत जाधव या कर्तव्यतत्पर मुलाशी लावलं. या दरम्यान 'सासवा' बदलल्या. मुलीला आणि भरतलाही त्याचा त्रास झाला. पण नेटाने त्याने संसार केला. आणि आता तर त्याने स्वत:चा संसार थाटलाय. खूप समाधान वाटतं!'

'हे नाटक कधी बंद होऊ नये. पण जेव्हा हे थांबेल त्याला कारणीभूत भरतच असेल. तो जोवर तडफेने काम करतोय तोवर हे नाटक सुरू राहील. त्याला कंटाळा येईल तेव्हा हे थांबेल! पण मला वाटत नाही की , अजून १९ वर्षाने ही वेळ येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाटक थांबलंय. त्यामुळे खूप नुकसान कलाकार, तंत्रज्ञांचं होतंय. पण त्याहीपेक्षा अधिक नुकसान रसिक प्रेक्षकांचं होतंय. त्यांचं दिलखुलासपणे हसणं थांबलयं. पण काळजी नको. कोरोना पें रोने के बाद, त्यावर जालिम इलाज फक्त एकच असणार आहे.. 'सही'.

श्री स्वामी समर्थांच्या कृपेने अशी कलाकृती माझ्या हातून घडली. पण यात माझ्या पाठीमागे असणारे स्वामी होतेच, पण त्यासोबत अजून एक व्यक्ती होती, माझा मित्र अंकुश चौधरी. मी, भरत, अंकुश या तिघांच्या मैत्रीचं प्रतिबिंब म्हणजे.. 'सही'.

kedar bharat ankush
'कोरोनाची सुरूवात कलाकारांनी केली की काय?', केदार शिंदेचा ठाकरे सरकारला टोला

'सही रे सही' या यशस्वी नाटकाच्या प्रवासाबद्दल सांगतानाच केदार शिंदेंनी नाट्यरसिकांना एक आश्वासन दिलं आहे. 'लवकरच भेटू' असा हॅशटॅग त्यांनी या पोस्टच्या अखेरीस दिला आहे. त्यामुळे नाट्यगृह सुरू होताच प्रेक्षकांचं हे लाडकं नाटक पुन्हा एकदा मनोरंजनासाठी सज्ज होणार असल्याचं समजतंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com