Kedar Shinde: 'बाईपण भारी देवा' नंतर केदार शिंदेंनी केली 'या' सिनेमाची घोषणा, सर्वांना आनंद

शरद व्याख्यानमालेचे पहिले पुष्प! "कलावंत म्हणुन माझा प्रवास" हा दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या व्याख्यानाचा विषय होता.
Director Kedar Shinde
Director Kedar Shinde Esakal

Kedar Shinde: ''बाईपण भारी देवा'' हा सिनेमा खरं तर पुरुषांनी मोठ्या प्रमाणात पहावा अशी अपेक्षा होती. मात्र फक्त स्त्रियांनीच या सिनेमाला प्रचंड गर्दी केली. ८० कोटींचा व्यवसाय स्त्रियांमुळे या सिनेमाला मिळाला. या प्रचंड यशानंतर लोक विचारतात, पुढचा सिनेमा कोणता? खरेतर मोठे यश प्राप्त केल्यानंतर जबाबदारी वाढते पण कारंजेकरांना सांगू इच्छितो की, लवकरच आम्ही आईपण भारी हा सिनेमा रसिकांसाठी घेऊन येत आहोत. असे चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे यांनी जाहीर केले.

कारंजा येथे सुरू असलेल्या शरद व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफतांना ते बोलत होते. "कलावंत म्हणुन माझा प्रवास" हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. प्रारंभी उपविभागीय अधिकारी ललित वराडे यांनी वक्त्यांचे स्वागत केले. प्रमोद दहिहांडेकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुशील देशपांडे यांनी परिचय करून दिला. देवेंद्र फडवणीस यांनी पाठविलेल्या संदेशाचे वाचन डॉ. अजय कांत यांनी केले. याप्रसंगी गतवर्षात दिवंगत झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Director Kedar Shinde
Jio Mami Film Festival: मुंबईत 'मामी फिल्म फेस्टिव्हल'चं शानदार उद्धाटन, या मराठी सिनेमांची पर्वणी

आपल्या कला प्रवासाविषयी बोलताना केदार शिंदे पुढे म्हणाले की, मला पायलट व्हायचे होते. त्यासाठी भोसला मिलिटरी स्कूलची पात्रता परीक्षा सुद्धा मी दिली होती आणि सिलेक्शन होऊन मी जॉईनही केले होते. त्यावेळी माझे आजोबा शाहीर साबळे यांचा महाराष्ट्राची लोकधारा नावाचा कार्यक्रम खेड्यापाड्यात पोहोचला होता; त्यासाठी त्यांना बालकलावंतांची खूप गरज भासू लागली.

त्यामुळे मी माझे पुढचे शिक्षण पूर्ण न करता त्यांच्यासोबत काम करू लागलो. २३ वर्षे त्यांच्या सोबत राहिलो. जेजुरीच्या खंडोराया जागराला या हो, ''अग अग अग विंचू चावला'', अशी अनेक प्रबोधन करणारी भारुडे त्यांनी सादर केली. ते दूरदृष्टीचे होते.

त्यांची कला पाहत मी मोठा झालो. त्यांचा वारसा मला पुढे चालवला पाहिजे, या जाणीवने मी या क्षेत्रात आलो. खरं म्हणजे हे क्षेत्र लोकांना खूप चांगले वाटते, मात्र या चांगल्यांच्या पाठीमागे खूप काळोख असल्याचे त्यांनी सांगितले.

Director Kedar Shinde
Box Office Collection Day: कंगनाचा तेजस बॉक्स ऑफिसवर भरारी घेईना! पहिल्या दिवशीच दणकुन आपटला... बाकीच्या सिनेंमाची अवस्था काय?

माझा पहिला सिनेमा फसला.'' जत्रा'' सिनेमाची निर्मिती केली. त्यावेळी माझ्यावर प्रचंड कर्ज होते. अनेक अडचणी आल्या. मात्र भरत जाधवसारख्या मित्रामुळे मी पुन्हा उमेदीने उभा राहिलो. अनेक एकांकिका व्यावसायिक नाटके केली, त्यात भरपूर पारितोषिके मिळालीत. १९९३ मध्ये ''बॉम्ब ए मेरी जान'', ''आमच्यासारखे आम्हीच'', श्रीमंत दामोदर पंत

Director Kedar Shinde
Mansi Mohille: 'काहे दिया परदेस' फेम अभिनेत्रीच्या लेकीचं झालं बारसं, ठेवलं हे नाव

या सिनेमांच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत पोहोचलो. २००२ साली सही रे सही हे नाटक सादर केले. त्याचे प्रचंड प्रयोग झाले. नंतर "लोच्या झाला", "गोपाळ रे गोपाळा" या चित्रपटांना रसिकांना भरभरून प्रेम दिले. ''मुक्काम पोस्ट लंडन'' या चित्रपटाचे शूटिंग तर लंडन येथे झाले. दूरदर्शनवर सुद्धा "गंगाधर टिपरे" ही मालिका सुरू केली.

२००४ ला "अगंबाई अरेच्चा," ''यंदा कर्तव्य आहे'' या सिनेमाने मला भरपूर समाधान व आनंद दिला. आणि कोरोनानंतर आलेला ''बाईपण भारी देवा'' हा सिनेमा तर घराघरापर्यंत पोहोचला. सैराटनंतर या चित्रपटाला भरघोस यश मिळालं, त्यामुळे रसिकांच्या अपेक्षा खूप वाढल्या असून आमची जबाबदारी सुद्धा वाढली असल्याचे केदार शिंदे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com